कॉलेज फेस्टची धमाल

December 20, 2008 3:27 PM0 commentsViews: 15

यूथ ट्युबच्या या भागात आमची रिपोर्टर प्रियांका पोहचली 'मूड आयमध्ये.' 'मूड आय' म्हणजेज 'मूड इंडिगो' हा आयआयटी पवईचा कॉलेज फेस्टिवलचा. मूड आय हा आशियातला सगळ्यात मोठा कॉलेज फेस्टिवल. साधारण 700 जण दिवस-रात्र काम करून 'मूड आय' आयोजित करतात. 7000 पेक्षा जास्त जण यात सहभागी होतात. वेगवेगळे इव्हेंट्स तर त्यात आहेतच पण या 'मूड आय' चं वैशिष्ट्य आहे 'नो फीट सर्कस.' फेस्टिवल जितकं भव्य आणि ऑर्गनाईझ्‌ड तितकीच त्यामागची तयारीही.मूड आयची ही सगळी तयारी तुम्ही सोबतच्या व्हिडिओवर क्लिक करून पाहू शकता.यानंतर आमची यूथ ट्युब रिपोर्टर रिचा पडते पोहचली भवन्सच्या 'ओ 2' या कॉलेज फेस्टमध्ये. या फेस्टचं वैशिष्ट्य होतं अ‍ॅड्व्हेंचर्स स्पोर्ट्स. अ‍ॅडव्हेंचर स्पोर्ट्स ठेवले खरे, पण रॉक क्लाइंबिंगसाठी 'रॉक्स' आणायचे कुठून ? आणि व्हॅली क्रॉसिंगसाठी कँपसमध्ये व्हॅली कोण बनवणार ? पण अडचणी स्वीकारून गप्प बसले तरा त्यांना 'यूथ' का म्हणायचं ? मग रॉक क्लाइंबिंगसाठी उभी राहिली आर्टिफिशल भिंत आणि व्हॅली च्या जागी बिल्डींग क्रॉस करण्याची मजा अनुभवली. या फेस्टचं वैशिष्ट्य म्हणजे आगळी वेगळी 'ऑब्स्टेकल रेस' आणि अ‍ॅड्व्हेंचर्स स्पोर्ट्समधला मुलींचा मोठा सहभाग. मग मुलींसमोर मुलं गप्प रहाणार का ? मग अमेरिकन फूटबॉल आणि देसी क्रिकेटची भेळ करून तयार झालं बेस क्रिकेट. एवढ्यावरही तुमचं समाधान नाही झालं ? तर मग पेश हैं 'भवन्स स्पेशल' क्लासरूम फूटबॉल. मैदानावरचं क्रिकेट रस्त्यावर जसं बनलं 'गली क्रिकेट' तसंच मैदानावरचा फूटबॉल झालाय 'क्लासरूम फूटबॉल.' पण हे फेस्ट म्हणजे फक्त मजा-मस्ती नव्हती, तर प्रदूषणाच्या जागतिक समस्येवर मात करण्याचा आपल्या परीनं छोटासा प्रयत्नही त्यांनी केला होता, आणि तोही एकदम 'हट के.' या प्रदूषणाचं वैशिष्ट्य होतं जंकृती. म्हणजे या फेस्टिवलचं सगळं डेकोरेशन कचर्‍यापासून म्हणजेच टाकाऊतून टिकाऊ या धर्तीवर बनवलं होतं.भवन्सच्या कॉलेज फेस्टची धमाल तुम्ही सोबतच्या व्हिडिओवर क्लिक करून पाहू शकता.

close