रुईयामधला पीस कॉन्सर्ट

December 20, 2008 2:15 PM0 commentsViews: 8

26/11 च्या घटनेनं मुंबईला हादरवून सोडलं. प्रत्येक मुंबईकर आपापल्या पद्धतीनं त्याच्या विरोधात उतरला. रुईया कॉलेजमध्ये त्याच्यासाठीच 'पीस कॉन्सर्ट' आयोजित करण्यात आली होती. या इव्हेंटमध्ये कोणी मोठे बॅनर नव्हते, पण इथे आलेल्या बॅन्ड्सनी लोकांना शांततेचा संदेश दिला. हृदयातल्या रागाला, द्वेषाला या कॉन्सर्टमध्ये तरुणाईनं वाट करून दिली. या पास कॉन्सर्टला जमा झालेले पैसे 'मुंबई पोलीस फंड' ला जाणार आहेत.रुईयातल्या पीस कॉन्सर्टची झलक पहाण्यासाठी सोबतच्या व्हिडिओवर क्लिक करा.'मूड आयचं' वैशिष्ट्य म्हणजे प्रो-नाईट इव्हेंट्स. मूड आयच्या चारही रात्री यात वेगवेगळ्या प्रकारची म्युझिक्स ऐकवली जातात. या वर्षी पहिल्या रात्री आहे 'रॉक म्युझिकची', दुसरी रात्र आहे 'क्लासिकल म्युझिकची' तिसर्‍या रात्री इथं परफॉर्म करणार आहेत 'इंडियन रॉक बॅन्ड्स' आणि चौथी रात्र 'बॉलिवुड के नाम.' यंदा प्रो नाईटमध्ये सोनू निगम लाईव्ह परफॉर्म करणार आहे.सिडनहॅम कॉलेजच्या 'ब्रूहाहा' चं वेशिष्ट्य होतं 'वॉर ऑफ डी-जे' आणि जॅपनीज सुमो रेसलिंगचं इंडियन व्हर्जन. 'ब्रूहाहा' मधला आणखी एक 'हट के' आणि क्रिएटिव इव्हेंट म्हणजे 'फ्रेमिंग द फ्रेम.' म्हणजे आधी कॅमेरातून फोटो काढायचे, त्यावरून एक गोष्ट लिहायची आणि काढलेल्या फोटोतून एक फोटो घेऊन त्यावर एक अ‍ॅबस्ट्रॅक्ट चित्र काढायचं. 'ब्रूहाहा' मधली ही सगळी धमाल यूथ ट्युब रिपोर्टर मयुरेश गणपत्येनं यूथ ट्युबच्या दर्शकांपर्यंत पोहचवली.'ब्रूहाहा' मधली ही सगळी धमाल तुम्ही सोबतच्या व्हिडिओवर क्लिक करून पाहू शकता.

close