गरोदरपणातली काळजी (भाग : 1)

December 22, 2008 10:53 AM0 commentsViews: 23

ज्यावेळी स्त्री आई होते त्यावेळी तिच्यावर निरनिराळ्या प्रकारच्या माहितीचा भडीमार होतो. हे कर, हे करू नको अशा निरनिरळ्या प्रकारच्या सूचनांचा तिच्यावर भडीमार होतो. पण अशावेळी त्या नुकत्याच होऊ घातलेल्या आईनं काय काळजी घ्यायची याकडे तिचं दुर्लक्ष्य होतं. आईचं तिच्या आरोग्याकडे, आहाराकडे आणि तब्येतीकडं दुर्लक्ष होऊ नये त्याकरता काय काय काळजी घेतली पाहिजे, याचं मार्गदर्शन ' टॉक टाइम 'मध्ये केलं गेलं. ते मार्गदर्शन स्त्री रोगतज्ज्ञ नीता कुलकर्णी यांनी केलं. ते व्हिडिओवर पाहता येईल. आईनं घ्यायची काळजी : बाळासाठी जोडप्याची मानसिक, शारिरीक आणि आर्थिक तयारी महत्त्वाची आहे. आई होण्याचा निर्णय योग्य वयात घेतला पाहिजे.डॉक्टरांच्या सल्लानं फॉलिक अ‍ॅसिड, आयन, कॅल्शियम, बी कॉम्पेक्स ही औषधं घ्यायची. आईनं रूबेलाची लस घेतली पाहिजे. आईनं HIV ची टेस्ट केली पाहिजे. आईन प्राणायाम केला पाहिजे.जास्त प्रवास करू नका.डिलीव्हरीबद्दल शास्त्र शुध्द माहिती करून घ्या.आपल्या डॉक्टरांशी बोलताना संकोच बाळगू नका.नियमित ब्लड प्रेशर चेक करा.सोनोग्राफीबद्दल भीती बाळगू नका. डिलीव्हरीसाठी निघताना आपली सर्व औषधं आणि रिपोर्टस् बरोबर घ्या.

close