विजेंदर कुमार लढतोय मुलांच्या हक्कांसाठी

December 9, 2008 12:51 PM0 commentsViews: 5

9 डिसेंबर दिल्लीफुटबॉलमध्ये मॅरेडोनाची जितकी क्रेझ आहे. तितकी सद्या बॉक्सिंगमध्ये विजेंदर कुमारची क्रेझ वाढली आहे. विजेंदर कुमारने बीजिंग ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकत अनेक तरुण बॉक्सर्सना प्रेरित केलंय. पण याच क्रेझच्या माध्यमाद्वारे आता क्राय या संस्थेबरोबर विजेंदर एक नवीन संदेश देताना दिसतो आहे.लढणं हे विजेंदरच मुख्य काम आहे. आणि तेही बॉक्सिंग रिंगणात. पण रिंगणाच्या बाहेरही विजेंदर कुमार लढताना दिसतोय लहान मुलांच्या हक्कांसाठी. त्यांच्या शिक्षणासाठी.क्राय या संस्थेतर्फे कॉरपोरेट जगातल्या लोकांना एकत्र आणून त्यांच्या आवडीचा खेळ खेळा असा अनोखा उपक्रम पार पाडण्यात आला. यातच सगळ्यांसाठी समान शिक्षण हा संदेशही यातून दिला.खेळाप्रमाणेच योग्य शिक्षणही मुलांच्या आयुष्यात गरजेचं असतं असं मत यावेळी विजेंदरने व्यक्त केलं.या उपक्रमात खेळाची मदत घेतली गेली कारण या कारणामुळे लोकं रस्त्यावर येतील आणि एका चांगल्या कामसाठी त्यांची मदतही होईलअसं क्रायचे पदाधिकारी सांगतात.गेली 9 वर्षे हा उपक्रम राजधानी दिल्लीत भरवला जातोय. कॉरपोरेट जगतातल्या लोकांना त्यांच्या कॉन्फरन्स रूममधुन बाहेर काढून एका चांगल्या कारणासाठी त्यांना आवाज उठवायला एकत्र आणलं जातंय.

close