कल्याणमधला देवगंधर्व महोत्सव

December 9, 2008 1:03 PM0 commentsViews: 7

9 डिसेंबर, मुंबई कल्याण गायन समाजातर्फे दरवर्षी देवगंधर्व महोत्सव भरवण्यात येतो. यंदा देवगंधर्व महोत्सव 12 ते 14 डिसेंबर या काळात कल्याणमध्ये भरणार आहे. महोत्सवाचं यंदाचं सातवं वर्षं आहे. दर वर्षी रंगारंग कार्यक्रम देणारा हा महोत्सव या वर्षीही बरंच काही घेऊन येतोय. गेली सहा वर्ष देवगंधर्व महोत्सवानं खूप चांगले कार्यक्रम दिले. प्रभा अत्रे, रशीद खान,अर्चना जोगळेकर, झेलम परांजपे अशा दिग्गज कलाकारांनी देवगंधर्वच्या व्यासपीठावर आपली कला सादर केली आहे. यंदा हरिहरनची गझल, देवकी पंडित आणि पंडित अजय पोहनकर यांचं शास्त्रीय गायन होणार आहे. याशिवाय आदिती भागवतचं कथ्थक आणि पंडित नीलाद्रीकुमारचं सतारवादन ऐकायला मिळेल. कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिरात हा महोत्सव होणार आहे.

close