गप्पा पक्षीनिरीक्षक आदेश शिवकरशी (भाग : 1)

December 24, 2008 1:43 PM0 commentsViews: 14

' सलाम महाराष्ट्र ' मध्ये पक्षीनिरीक्षक आदेश शिवकर आले होते. त्यांनी पक्षी बघणं आणि निरीक्षण करणं यांच्यामधला फरक सांगितला. पक्षीनिरीक्षण कसं करावं याविषयीही मार्गदर्शन केलं. त्याविषयी पक्षीतज्ज्ञ आदेश शिवकर सांगतात, " माणसाला निरनिराळ्या प्रकारचे छंद असतात. त्या छंदापैकीच एक पक्षीनिरीक्षण आहे. पक्षी निरीक्षणामध्ये फक्त पक्षी ओळखताच येत नाही तर पक्षांच्या निरनिराळ्या सवई, त्यांच्या हालाचाली, त्यांचे आवाज, रंग, प्रकार-उपप्रकार, हे पक्षी कुठे राहतात, ते कसे जगातात यांचा अभ्यास करणं आणि नोंदी ठेवणं हे सगळं येतं. या सगळ्यांचा समावेश होतो. पक्षी निरीक्षण करताना त्याविषयाची जिज्ञासा असणं आवश्यक आहे. पक्षी निरीक्षण ही एका रात्री येणारी गोष्ट नाहीये. तर ती टप्प्या टप्प्यानं येते. सरावानं जमतेही. मला लहानपणापासूनच पक्षी निरीक्षणाची आवड होती. नंतर त्याचं मला व्यसनच लागलं. एका खाजगी कंपनीत नोकरी करत असताना मला माझा छंद स्वस्थ बसू द्यायचा नाही. तसंच प्रत्येक विषयवार स्वतंत्रपणे पुस्तकं आहेत, मॅगझीन्स आहेत पण पक्षांवर फारशी नाहीयेत. त्यामुळे पक्षांवर पूर्णवेळ साहित्य काढावं या ध्यासापोटी मी स्वत:ला पक्षी निरीक्षणाच्या कार्यात वाहून घेतलं आहे." आदेश शिवकर यांनी पक्षी निरीक्षणाबाबत सांगितलेली माहिती व्हिडिओवर पाहता येईल.

close