केकच्या रेसिपीज – (भाग : 1)

December 24, 2008 1:37 PM0 commentsViews: 168

आपण अनेक वेळा घरी केक बनवण्याचा प्रयत्न करतो ,पण प्रमाण बरोबर असूनही कधी कधी आपला केक फसतो असं का होतं ? आणि केक बनवण्याच्या सोप्या पध्दती कोणत्या यांवर ' टॉक टाइम ' पेस्ट्री शेफ निकिता रामपाल यांनी मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर त्यांनी केकच्या काही कृतीही सांगितल्या. ते व्हिडिओवर ऐकता येईल. केक बनवताना – केक बनवण्यासाठी वापरण्यात येणारं प्रत्येक साधन रुम टेम्परेचरला असावं.केक बेक करताना अव्हन किंवा कुकर प्री हीट करून घ्यावा.क्रम, बटर, साखर जितकं हलकं फेटता येईल तितकं हलकं फेटावं.केकची सामग्री फेटताना एकाच डायरेक्शनमध्ये फेटावी.केकचं अर्धं भांडंच मिश्रणानं भरायचं. कारण बेक झाल्यावर केक फुलतो.केक बेक झाल्यावर प्रथम त्याच भांड्यात थंड करावा. म्हणजे केकच्या कडा बरोबर सुटतील.केकमध्ये मोठ्या अंड्यांचा वापर करावा.केकची कृती रिच प्लम केक साहित्य – 1/2 कप मैदा, 1/4 टी स्पून बेकिंग पावडर, 1 चिमूट जायफळ, 1 चिमूट वेलची पावडर, 1 चिमूट दालचीनी पावडर , 1/3 कप कॅस्टर शुगर1/4 चमचा केकजेल, 2 अंडी, 3/4 व्हॅनिला इसेंस, खाण्याचा ब्राऊन कलर, 25 ग्रॅम बटर, 1 टी स्पून ऑरेंज पिल्स, 1/4 कप रम फ्रुट्स.कृती – केकच्या भांड्याला बटर पेपर आणि लोणी लावून घ्यावं. बटर मेल्ट करून गार करावं. मैदा, बेकिंग पावडर चाळायची. भांड्यात जायफळ, वेलची, दालचीनी पावडर, शुगर, जेली, अंडी 4-5 मिनिटं फेटून घ्यवीत. मिश्रण फेटतानाच इसेंस, कलर, ऑरेंज पिल्स, रमफ्रुट्स घालणे आणि कुकर, ओटीजी किंवा मायक्रोमध्ये बेक करणं. मिल्क पावडर केक साहित्य – 1 वाटी मैदा, 1/2 टी स्पून बेकिंग पावडर , 1/2 टी स्पून खाण्याचा सोडा , 1/2 टी वाटी दूध पावडर, 1/2 वाटी साखर, 1/2 वाटी दूध1/2 वाटी लोणीकृती – मैदा बेकिंग पावडर सोडा चाळून घ्यावा. दूध पावडर, साखर, लोणी, दूध, मिक्सरमधून फेटून घ्यावं. नंतर त्यात मैदा इसेन्स घालून हाताने फेटलेलं मिश्रण केक पॉटमध्ये घालून 30 ते 40 मिनिटे 180 डिग्रीवर बेक करा.

close