गोष्टी ख्रिसमसच्या (भाग : 1)

December 25, 2008 11:58 AM0 commentsViews: 161

25 डिसेंबर म्हणजेच ख्रिसमस. तर हा ख्रिसमस नाताळ म्हणूनही परिचित आहे. जगभर नाताळ साजरा केला जातो. या नाताळच्या निमित्तानं ' टॉक टाइम 'मध्ये कवयित्री आणि लेखिका असलेल्या डॉ. सिसिलिया कार्व्हालो आल्या होत्या. त्यांनी नाताळच्या परंपरेविषयी माहिती सांगितली. सिसिलिया कार्व्हालो यांनी नाताळ या शब्दाच्या व्युत्पत्ती बदलही सांगितलं. सिसिलिया सांगतात , "नाताळ हा मुळामध्ये लॅटीन शब्द आहे. नेटल या शब्दाचा अपभ्रंश होऊन नाताळ या शब्दाची व्यत्पुत्ती झालेली आहे. नेटल म्हणजे अर्भकाचा जन्म. तर नाताळ हा शब्द मराठीत इतका चपखल बसलेला आहे की तो मराठी होऊन गेलेला आहे. ख्रिस्ताचा जन्म, देव पुत्राचा जन्म, अर्भकाचा जन्म आर्थी ' नाताळ ' आणि ' ख्रिसमस ' हे शब्द वापरले जातात. ख्रिसमस हा ग्रीक शब्द आहे. ख्रिस्तोस मास किंवा ख्राईस फॉर मास अशी ख्रिसमस या शब्दाची शब्दफोड होते. यातली मास म्हणजे जनता आणि ख्राईस्ट म्हणजे तारणारा. तर जगाचं, जनतेचं, समूहाचं तारण करण्यासाठी येशू जन्माला आलेला आहे. म्हणून या दिवसाला ख्रिसमस असंही म्हटलं जाऊ लागलं आहे." नाताळ म्हणजे सांताक्लॉजलाही अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याबद्दल सिसिलिया कार्व्हालो सांगतात, " सेंट निकोलस हे बिशप होते. ते लोकांना मदत करायचे. लोकांना मदतीचा हात द्यायचे. ते एका मोजामध्ये लोकांसाठी मदत ठेवून द्यायचे. असंही म्हणतात की तीन मुली होत्या. त्या मुलींचं लग्न झालेलं होतं. पण त्यांच्याकडे त्यांचं लग्न सेलिब्रेट करायला पैसे नव्हते. तर अशावेळी त्यांना या तीन मुलींना सेंट निकोलस यांनी मदत केली होती. त्यांच्या मदतीमुळे त्या मुली स्वत:चं लग्न साजरं करू शकल्या. " अशा असंख्य नाताळच्या आठवणी, या सणाच्या निमित्तानं ख्रिस्ती करत असणारे खाद्यपदार्थ, तो साजरा करण्याची पद्धत अशा भरपूर गोष्टींबद्दल डॉ. सिसिलिया कार्व्हालो यांनी 'टॉक टाइम'मध्ये माहिती सांगितली. ती िव्हडिओवर ऐकता येईल. ' आयबीएन – लोकमत ' च्या वाचकांसाठी कवयित्री डॉ. सिसिलिया कार्व्हालो यांनी नाताळच्या निमित्तानं कविता रचली आहे… तेव्हा तुझ्या हातापायात ठोकले होते तीनच खिळेदेह तुझा लटकतोय घेऊन दु:खकळेपुन्हा तुझा स्वर उंचावूनआता तरी प्रार्थना करकाय करतात कळत नाहीबापा त्यांना क्षमा करपाण्याचाही द्राक्षरस केलासत्याची एकदा आठवण कररक्तपिपासू प्राण्याचा पुन्हा एकदा माणूस करडॉ. सिसिलिया कार्व्हालो

close