अनुभव माधवी करंदीकर आणि प्रसाद सेवेकरींचे (भाग – 1)

December 26, 2008 3:21 PM0 commentsViews: 30

' सलाम महाराष्ट्र 'मध्ये अ‍ॅडॉप्शन कार्यकर्त्या माधवी करंदीकर आणि प्रसाद सेवेकरी आले होते.

मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्याला 26 डिसेंबरला एक महिना पूर्ण झाला आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनस वर सुरू झालेला हा रक्तपाताचा घातकी प्रकार 59 तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनतर आटोक्यात आला. भारताच्या अस्मितेवरच झालेला हा हल्ला पोलीस आणि जवानांनी आपल्या प्राणांचं मोल देत परतवून लावला… मात्र या भयानक हल्ल्याची किंमत निष्पाप नागरिकांबरोबर कर्तबगार अधिकारी आणि जवानांना चुकवावी लागलीं. ताज आणि ओबेरॉयसारख्या हॉटेल्सना लक्ष करून जगाचं लक्ष वेधण्याचाही हा प्रयत्न होता. या सगऴ्या प्रकारानं भारताच्या सुरक्षा व्यवस्थेची लूप होल्स दिसून आली, तसच असामान्यांच्या सुरक्षेबद्दल सरकारी बेफिकीरीही होता. या सगऴ्या प्रकारानं भारताच्या सुरक्षा व्यवस्थेची लूप होल्स दिसून आली, तसच सामान्यांच्या सुरक्षेबद्दल सरकारी बेफिकीरीही. राजकारण न करण्याचं आवाहन होउनही ते झालचं आणि रा़जकीय उलथापालथीही झाल्या. अखेर लोकांना रस्त्यावर येउन त्याचा संताप व्यक्त करावा लागला. याच हल्ल्यावरून आता भारत पाकिस्तानमध्ये कमालीचा तणाव निर्माण झालाय…पण सर्वसामान्यांनी झेललेले शारीरिक आणि मानसिक घाव भरून यायला बराच कालावधी लागणार आहे… जेव्हा ताजवर हल्ला झाला तेव्हा त्या हल्ल्याच्या प्रत्यक्ष साक्षीदार माधवी करंदीकर तिथं होत्या. माधवी ताई अ‍ॅडॉप्शन कार्यकर्त्या आहेत. बाल आशा ट्रस्टसाठी त्या काम करतात. ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी त्यांच्यासोबत राज्याच्या गृह सचिव चित्कला झुत्शीसुद्धा होत्या. त्या वेळी नेमकं काय झालं, त्या वेळची त्यांची मानसिक स्थिती कशी होती, काय होता तो अनुभव माधवीताईंनी सांगितला. 26 डिसेंबरला इंडोनेशियामध्ये आलेल्या भयंकर अशा त्सुनामीला 4 वर्षं पूर्ण होत आहेत. या त्सुनामी आपत्तीमध्ये हजारो लोकं मृत्युमुखी पडले, लाखो बेघर झाले.त्यावेळेस प्रत्यक्ष इंडोनेशियात जाऊन तिथे काम करणारे प्रसाद सेवेकरी आपल्यासोबत आहेत.ते व्यवसायाने सिव्हिल इंजिनिअर आहेत. आणि आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ आहेत. युनिसेफ साठी ते फ्री लान्सर कन्सल्टंट म्हणून काम करतात.निरनिराळ्या नैसर्गिक आणि मानव निर्मित आपत्तीत त्यांनी आपत्ती व्यवस्थापनाचं काम केलंय.गुजरातमधला भूकंप असो,की पॅलेस्टाईनचा प्रश्न असो त्यांनी तिथे जाऊन काम केलं आहे. प्रसाद सेवेकरींनी त्यांना आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ म्हणून काम करताना काय काय अनुभव आले, अशावेळेस नेमकं काय केलं पाहिजे यावरही मार्गदर्शन केलंमाधवी करंदीकर आणि प्रसाद सेवेकरींचे अनुभव ऐकण्यासाठी व्हिडिओवर क्लिक करा.

close