कर्ज मिळणं आता सुलभ होणार

December 9, 2008 1:31 PM0 commentsViews: 2

20 लाखांपर्यंतच्या कर्जावरचे नियम शिथील करावेत अशा सूचना आरबीआयने दिल्या होत्या. त्यामुळे आता ही कर्ज मिळणं तुलनेनं सोपं होणार आहे . घर घेणा-यांपैकी दोन तृतीयांश लोक हे 20 लाखांपर्यंतचं कर्ज घेतात. म्हणून अर्थव्यवस्थेला मंदीतून बाहेर काढण्यासाठी या कर्जाची संख्या वाढवणं गरजेचं आहे. यासाठी बँका खास पॅकेज जाहीर करतील. शिवाय बँकांनी व्याजदर कमी करण्याच्या सूचनाही आरबीआयने दिल्या होत्या. त्यानुसार एचडीएफसीने व्याजदर अर्धा टक्के कमी केलं आहे. ही कपात दोन टप्प्यात होईल. पहिली कपात 15 डिसेंबर तर दुसरी जानेवारीमध्ये लागू होईल. युनियन बँकेने व्याजदर पाऊण टक्के कमी केलं आहेआता नवा दर 12 टक्के असेल. इंडियन बँकेनेही व्याजदर पाऊण टक्के कमी केला आहे. आणि हे नवे दर लगेच लागू होणार आहेत. कर्जाचे व्याजदर जसे कमी होतील तसा त्याचा परिणाम ठेवींवरच्या व्याजदरांवरही होईल बँका हे व्याजदरही कमी करतील.

close