फंडे करिअरचे (भाग : 2)

December 27, 2008 1:26 PM0 commentsViews: 14

आय.टी.तज्ज्ञ अच्युत गोडबोले यांनी ' फंडे करिअरचे 'मध्ये चांगल्या पण यशस्वी करिअरची तत्त्वं सांगितली आहेत. त्याचा पुढचा भाग. फंडे करिअरचे (भाग : 2)इंटरव्ह्यूला मुलं आल्यावर त्यांना साध्या साध्या गोष्टींची माहिती नसते. तेव्हा करिअरच्या बेसिक फन्डामध्ये ज्ञानाविषयी प्रेम असणं ही गोष्ट महत्त्वाची आहे तर…हो. आणि ते खूप गरजेचं आहे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणं मी आजपर्यंत कित्येक आयटी पदवीधर मुलांच्या मुलाखती घेतल्या आहेत. पण त्या मुलाखती घेताना माझी दारुण निराशा झालेली आहे. मी आता मुलांना तुम्ही इतर गोष्टी काय करतात ते विचारण्याच्या भानगडीतच पडत नाही. मुलाखतीला जाताना कपडे कसे घालावेत, कोणते घालावेत, कसं बोलावं याची माहिती मुलांना असते. पण आपण ज्या विषयातून शिक्षण घेतलं आहे, त्याची माहिती अजिबात नसते. हे योग्य नाही. ज्ञानाविषयी प्रेम असणं फार महत्त्वाचं आहे. बहुतेक मुलं मार्क आणि भविष्यात नोकरी यांच्यासाठी शिकतात. पण जी मुलं ज्ञानासाठी शिकतात तीच पुढे आयुष्यात यशस्वी होतात. कधीकधी एखाद्या व्यक्तीला तो जे काम करत आहे, ते आवडेनासं होतं. पण तो त्यावेळेला इतर गोष्टी चांगल्या करत असतो. अनेकदा मनात नोकरी सोडण्याचेही विचार येतात. मग अशावेळी त्या व्यक्तीनं काय करायला पाहिजे ?आपल्याला नोकरी करणं का आवडत नाही याची कारण शोधलं पाहिजे. एक तर ती व्यक्ती जे काम करत आहे ते काम आवडीचं नसतं किंवा काम आवडीचं असूनही कामातून समाधान मिळत नसतं. ही दोन कारणं असू शकतात. अशावेळेला झटपट नोकरी सोडणं कधीच चांगलं नाही. शेवटी पोटाचा प्रश्न असतो. या परिस्थितीत आपण जे काम करत आहोत ते चालू ठेवायचंच पण दुसरीकडे स्वत:ला आवडीच्या विषयात गुंतवायचं. तसं केल्यानं अनेक पर्याय खुले होतील. करिअरचे आणि समाधानाचेही. सध्या जगात मंदीचं वातावरण सुरू आहे. स्वच्छेनं आणि आवडीच्या विषयात करिअर करूनही कित्येक पदवीधरांना कंपनीतून कमी केलं जात आहे. अशास्थितीत आयटीक्षेत्रात करिअरच्या काही संधी आहेत का, किंवा आयटी पदवीधरांनी काय केलं पाहिजे ?आयटी पदवीधरांना दोन पद्धतीनं करिअर करता येत. एक म्हणजे टेक्नॉलॉजीत आणि दुसरं म्हणजे टेक्नॉलॉजी मॅनेजमेंटमध्ये. आता टेक्नॉलॉजी हे क्षेत्र असं आहे की मॅनेजमेंटच्या माणसाला टेक्नॉलॉजी चांगली माहीत असणं गरजेचं आहे आणि टेक्नॉलॉजीच्या माणसाला मॅनेजमेंट उत्तम येणं आवश्यक आहे. टेक्नॉलॉजीच्या माणसाला मॅनेजमेंट आवडत असेल तर इच्छा असल्यास एमबीए करावं. नाहीतर टेक्नॉलॉजीचे इतर कोर्स करून साऊण्ड व्हावं. मॅनेजरिअल स्किल्समध्ये तुमची पर्सनॅलिटी कशी आहे, तुम्ही समोरच्याला कसे जोडून घेतात ही स्किल्स सगळ्यांना ठाऊक आहेत. पण अजून कोणती स्किल्स मॅनेजरिअल लेव्हलमध्ये येतात ? यात व्यक्तिमत्त्वविकास आणि करिअर यांचा एकमेकांशी कसा संबंध येतो ?मॅनेजरिअल स्किल्समध्ये यक्तिमत्त्वविकास आणि करिअर यांचा एकमेकांशी संबंध येतो. कारण एखाद्या माणसला तंत्रज्ञानाविषयी खूप माहिती आहे पण जर तो एकल कोंडा असेल तर तो चांगला सीईओ कधीच होऊ शकणार नाही. आपल्याबरोबर चार लोकांची आणि कंपनीची प्रगती करण्याची ताकद ज्याच्याकडे असेल तो चांगला सीईओ होऊ शकतो.

' फंडे करिअरचे ' चा पुढचा म्हणजे तिसरा भाग पाहण्यासाठी फंडे करिअर (भाग :3) पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक कारा. .

http://ibnlokmat.tv/programdetails.php?id=33831&channelid=291

close