फंडे करिअरचे (भाग : 3)

December 27, 2008 1:26 PM0 commentsViews: 5

आय.टी.तज्ज्ञ अच्युत गोडबोले यांनी ' फंडे करिअरचे 'मध्ये चांगल्या पण यशस्वी करिअरची तत्त्वं सांगितली आहेत. त्याचा पुढचा भाग. फंडे करिअरचे (भाग : 3)मंदीची झळ मार्केटिंग या क्षेत्राला बसत आहे. अशावेळेला करिअरचं मॅनेजमेंट कसं करावं ?मंदीची समस्या जेन्युईन आहे. मंदीचा काळ कधी संपेल हे सांगता येणार नाही. मला स्वत:ला असं वाटतं की हा वेळ वाया घालवता कामा नये. कारण मंदी कायमची टिकणार नाही. ही मंदी जेव्हा जाईल तेव्हा प्रत्येकानं विनर म्हणून पुढे यायला पाहिजे. या काळात पर्सनॅलिटी डेव्हलप करणं, इंग्रजी सुधारणं, इतर वेगळे मॅनेजमेंट कोर्सेस करणं, किंवा स्वत:ला काही उद्योग जमतोय का, ते करून पहायचं. मार्केटिंगच्या माणसानं कॉलेजमध्ये शिकवायला जावं. कित्येक कॉलेजमध्ये मार्केटींगचा इंडस्ट्रीयल अनुभव असणारी माणसं लेक्चरर म्हणून लागतात. मार्केटिंगच्याच नाही पण कोणत्याही माणसानं प्राध्यपकी केल्यावर आधी त्याचा स्वत:चा विषय पक्का होतो. पब्लिक स्पिकिंग वाढतं. मंदी आली म्हणून रडत न बसता मंदीला संधी समजून मी काम करावं.

close