तरुणाईचा उत्स्फूर्त आविष्कार – मूड इंडिगो

December 27, 2008 12:35 PM0 commentsViews: 42

सेलिब्रेशन म्हणजे मजा, मस्ती आणि धम्माल! आणि हे सगळं अनुभवयाला कॉलेज फेस्टिवलपेक्षा जास्त चांगलं ठिकाण असूच शकत नाही. आणि त्यातही ते आशियातलं सगळ्यात मोठं कॉलेज फेस्टिवल असेल तर मग विचारायलाच नको! युथ ट्युबची टीम या वेळेस पोहचली थेट आयआयटी पवईच्या वार्षिक कॉलेज फेस्टिवल म्हणजेच 'मूड इंडिगो' मध्ये.तशी तर हजारो कॉलेज फेस्टिवल्स दर वर्षी भरतात. पण त्यातल्या कशालाच मूड इंडिगोची सर नाही. इथे स्पर्धा आणि क्रिएटीविटीला भरपूर स्कोप होता. या फेस्टिवलचा 'हट के' पणा दिसतो तो इथल्या इव्हेंट्समध्ये. उदाहरणच घ्यायचं झालं तर अ‍ॅक्वा गेम्सचं घ्या. 'अ‍ॅक्वा गेम्स' म्हणजे आपल्या नेहमीच्याच स्विमिंग पूल ला दिलेले 'अ‍ॅड्व्हेंचरस स्ट्रोक्स.' आता पाण्यात मनसोक्त धिंगाणा घालून झाला असेल तुमच्या साठी होता 'शॅल वुई डान्स हा इव्हेंट. आणि तुम्ही जर का गर्ल फ्रेंड किंवा बॉयफ्रेडबरोबर असाल, तर तुमच्यासाठी होते खास 'कपल गेम्स.' आणि या सगळ्यात 'मूड आय' चे ऑर्गनायझर्स आपल्या संस्कृतीला विसरले नाहीत. त्यासाठीच होता खास शास्त्रीय संगिताला बढावा देणारा 'मेहफिल-ए-साज' हा इव्हेंट. पण जर तुम्हाला खरच शास्त्रीय संगितात रस नसेल तर तुम्ही एन्जॉय करू शकत होता 'बॅन्ड कॉम्पिटीशन.' यातल्या परफॉर्मन्सबरोबरच बँडची नावही तितकीच हट के होती. उदाहरणच घ्यायचं झालं तर… 'एटीकेटी.' लगेच दचकू नका… एटीकेटी म्हणजे 'अब तक कहा थे.' एवढे मोठे फेस्टिवल भरवायचे असेल तर त्यामागे मेहनतही तेवढीच मोठी लागते. आणि म्हणूनच आमची टीम ऑर्गनायझर्सला विसरले नाहीत. 400 जणांनी नऊ दिवस केलेल्या मेहनतीचं फळ म्हणजे मूड आय. आणि तुम्हालाही जर तुमच्या कॉलेज फेस्टची उंची वाढवायची असेल, तर सोबतचा व्हिडिओ नक्कीच बघा. कारण मूड आय च्या ऑर्गनायझर्सनी ऑर्गनायझिंग स्किल्सची झलक तुम्ही सोबतच्या व्हिडिओवर बघू शकता.काय मग, हा भाग बघून तुमचा मूड आयचा अनुभव पुन्हा ताजा झाला ना ? काय सांगता तुम्ही मूड आय ला गेलाच नव्हता ? नो प्रॉब्लेम. खास तुमच्यासाठी आम्ही मूड आय ची ही सगळी मजा घेऊन आलो आहोत. तुम्हाला फक्त थोडेसे कष्ट करून सोबतच्या व्हिडिओवर क्लिक करायचंय.

close