गप्पा मंगेश बोरगावकरशी

December 29, 2008 5:47 AM0 commentsViews: 4

सारेगमपच्या माध्यमातून घरोघरी पोहोचलेला गायक मंगेश बोरगांवकर ' सलाम महाराष्ट्र ' मध्ये आला होता. त्याने एकसोएक गाणी प्रेक्षकांची सकाळ संगीतमय केली. मंगेशचा ' गाणं मंगेशाचं ' हा कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय होत आहे. नुकतेच या कार्यक्रमाचे 50 भाग पूर्ण झाले आहेत. गाणे मंगेशाचे या कार्यक्रमाविषयी मंगेश बोरगावकर सांगतो, "आमच्या लातुर मध्ये संगीत शिकण्याची, गाणं गाण्याची आवड सगळ्यांनाच आहे. काही मुलांना परिस्थितीमुळे शिकता येत नाही. अशा मुलांना गाणं शिकायला मिळावं यासाठी संगीत शाळेची आणि संगीत वसतिगृह स्थापण्याची माझी इच्छा आहे. त्यासाठी जो निधी लागणार तो आम्ही ' गाणं मंगेशाचे ' या कार्यक्रमातून जमवणार आहोत. नि संगीताची आवड असणा-या होतकरू मुलांसाठी नवं व्यासपीठ निर्माण करणार आहोत. " मंगेशनं शुरा मी वंदिले… ' सारखी गाणी गाऊन सलाम महाराष्ट्रची सम बांधली. मंगेशची मारलेल्या गप्पा या ' सलाम महाराष्ट्र 'मध्ये ऐकता येतील.

close