वयात येताना… (भाग : 3)

December 29, 2008 11:22 AM0 commentsViews: 323

' टॉक टाइम ' मध्ये मुलगी वयात आल्यावर आल्यावर तिच्यात होणा-या शारीरिक आणि मानसिक बदलांवर चर्चा करण्यात आली होती. याविषयावर बोलण्यासाठी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. अंजली बापट आल्या होत्या. मुली वयात येताना त्यांच्यात होणा-या बदलांना सकारात्मक पद्धतीनं घ्यायला हवं. या विषयी डॉ. अंजली बापट सांगतात, " मुलींचं वयात येणं ही गोष्ट एखाद्या कळीचं फुलात रुपांतर होण्यासारखीच गोष्ट आहे. मुलींच्या वयात येण्यामागे बरीचशी शास्त्रीय कारणं आहेत. हायपोथॅलेमस हा मेंदूतला आतिशय आहे. या हायपोथॅलेमसमधून अतिशय महत्त्वाची हार्मोन्स तयार होत असतात. त्या हार्मोन्सचा परिणाम हा पिट्युटरी ग्लॅन्डवर होतो. पिट्युटरी ग्लॅन्डमधून 7 ते 8 प्रकारचे महत्त्वाचे हार्मोन्स असतात. या हार्मोन्समधले एफएसएच आणि एलएसएच हे दोन महत्त्वाचे हार्मोन्स आहेत. त्या हार्मोन्सचा परिणाम हा ओव्हरीजवर होतो. ओवरीजमधल्या इन्स्ट्रोजन प्रोस्टोजनचा परिणाम हा गर्भाशयावरती होतो. या सगळ्या हार्मोन्सच्या साखळीचा परिणाम थायरॉइवर होतो. या सगळ्या बदलाचा परिणाम म्हणजे एका छोट्या मुलीली पिरिअड्स येतात. पिरिअड्स हा एकमेव परिणाम नाहीये. तर मुलीमध्ये अनेक आंतबाह्य बदल होतात. जसं काखेत आणि गुप्तांगांवर केस येणं, मुलीच्या स्तनांची वाढ होणं." मुली वयात यायाला लागल्यावर त्यांच्या स्मरणशक्तीवर परिणाम होतो, अशी काही पालकांची तक्रार असते. त्याविषयी डॉ. अंजली बापट सांगतात, " मुली वयात यायला लागल्यावर त्यांच्या स्मरणशक्तीमध्ये परिणाम होत नसून मुलींच्या एकाग्रतेवर परिणाम होतो. वयात येणा-या मुली स्वत:तच जास्त रमायला लागतात. त्यावेळी स्वाभाविकपणे अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं. अशावेळी मुलींची अभ्यासाविषयीची एकाग्रता कमी होते. एकाग्रता कामी होणं म्हणजे स्मरणशक्तीवर परिणाम होणं नाही. " वयात येणा-या मुलींच्या आई वडिलांनाही डॉ. अंजली बापट यांनी मार्गदर्शन केलं. डॉ. अंजली बापट सांगतात, " मुलगी वयात येताना या मुलींशी वागावं कसं याची ?, मुलींना काही गोष्टी सांगाव्यात कशा याची चिंता लागून राहते. अशावेळी आईनं स्वत:चं बालपण आठवावं. तीही कधीतरी या वयात होती. या वयातून तीही गेलेली आहे. तिच्यावर चीडचीड न करता तिला सगळ्या गोष्टी सांगून टाकाव्यात. आईनं मुलीची मैत्रीण बनणं सगळ्यात चांगलं असतं. " डॉक्टरांनी सॅनेटरी नॅपकिन्स तसंच आंतरवस्त्र यावरही मार्गदर्शन केलं. " सॅनेटरी नॅपकीन वापरून झाल्यावर टाकताना ते उघड्यावर न टाकता कागदात व्यवस्थित रॅप करून टाकावेत. आंतरवस्त्र ही कॉटनची वारावीत, असा सल्ला डॉक्टरांनी दिला.वयात येणा-या मुलींसाठी शारीरिक शिक्षणही फार महत्त्वाचं असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. ते सांगताना डॉक्टरांनी त्यांच्या लहानपणीची गोष्ट सांगितली. " मी शाळेत असताना माझ्या वर्गातल्या मुलीला पिरिअड्स आले. आमच्या शिक्षकांनी तिला घरी पाठवलं. त्या मुलीची आई आफिसला गेली होती. संध्याकाळी ती मुलगी आईपरत येईपर्यंत आपल्याला काही जखम झाली या भावनेनं तशीच रडत बसली होती. संध्याकाळी जेव्हा आई आली तेव्हा तिच्यावरचे सगळे सोपस्कार झाले. म्हणून माझं असं मत आहे की या वयात मुलींना स्त्रीरोगतज्ज्ञांकडून सेक्स एज्युकेशन देणं गरजेचं आहे. " मुलींना खेळायला देणं तसंच व्यायाम करायलाही सांगितलं पाहिजे. असं केलं तर शरीराला चांगला टोन आणि शेप मिळतो. ' टॉक टाइम ' मध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. अंजली बापट यांनी केलेलं मार्गदर्शन व्हिडिओवर पाहता येईल. मुलगा-मुलगी दोघांमधे होणारे बदलमुलांमधील शारीरिक बदल -आवाज फुटतो.उंची वाढते.मुलींमधील शारीरिक बदल -पाळी सुरू होते.स्तनग्रंथीची वाढ होते.मुलींच्या स्वभावातील बदलकधी खूप चीडचीड तर कधी हळवेपणा वाटतो.भिन्न लिंगाबाबत आकर्षण वाटायला लागतं.काय करालबदलांमुळे घाबरून न जाता शास्त्रीय माहिती करून घ्या.शरीरातील बदलांना पूरक आहार घ्या.या विषयावरील पुस्तकं वाचा.भरपूर खेळा,व्यायाम करा.पालकांची भूमिकाशरीरातील बदलांची शास्त्रीय माहिती द्या.प्रेम आणि आकर्षणातील फरक सांगा.सामाजिक जबाबदारीची जाणीव करून द्या.

close