इंग्लंडची टीम टेस्ट मॅच खेळायला भारतात आली

December 9, 2008 3:19 PM0 commentsViews: 3

9 डिसेंबर इंग्लंडच्या भारत दौ-याला अखेर ग्रीन सिग्नल मिळालाय आणि केविन पीटरसनच्या नेतृत्वाखाली इंग्लंडची टीम टेस्ट मॅच खेळायला भारतात आली आहे.दहशतवाद्यांना क्रिकेट जगतानं दिलेलं हे उत्तर असल्याचं आयसीसीनं म्हटलं आहे. भारतीय क्रिकेट फॅन्सनंही या टेस्ट मॅचला जास्तीत जास्त संख्येन उपस्थित राहून एकजूटतेला साथ द्यावी असं आवाहनही त्यांनी केलं आहे.10 दिवसांपूर्वीच मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यांमुळे इंग्लंडची टीम मायदेशी परतली होती. त्यामुळे नियोजित दौ-यातील टेस्ट सीरिज रद्द होणार असं सर्वांना वाटलं होतं. पण बीसीसीआयने दिलेली आश्वासनं, कडक सुरक्षा व्यवस्था आणि क्रिकेटमधली बीसीसीआयची अर्थिक ताकद या गोष्टीमुळे इंग्लंडची टीम अखेर भारतात परतली. इंग्लंड टीममधल्या स्टीव्ह हार्मिसन आणि अ‍ॅण्ड्र्यु फ्लिन्टॉफ सारख्या काही सीनियर प्लेयर्सनी भारत दौरा करण्यास नकार दिला होता. पण भारत दौरा सुरू ठेवण्याचा निर्णय हा संपूर्ण टीमचा असल्याचं फ्लिन्टॉफने सांगितलं. इंग्लंडची टीम पूर्ण ताकदीनिशी दौ-यावर आली असली तरीही मोहालीत होणारी दुसरी मॅच ते खेळणार की नाहीत यावर प्रश्नचिन्ह कायम आहे.

close