गगन नारंगची जागतिक क्रमवारीत 6व्या स्थानावर झेप

December 9, 2008 3:32 PM0 commentsViews: 2

9 डिसेंबर नेमबाजीतही भारतासाठी एक खुशखबर आहे. जागतिक नेमबाजी स्पर्धेत विक्रमी कामगिरी करणा-या गगन नारंगने जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर झेप घेतली आहे. दहा मीटर एअर रायफल प्रकारात यापूर्वी तो 9व्या स्थानावर होता. काही महिन्यांपूर्वी नारंगने बँकॉक इथं झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत 600 पैकी 600 गुण मिळवण्याचा पराक्रम केला होता. याच प्रकारात ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवणारा अभिनव बिंद्राने क्रमवारीतलं आपलं दुसरं स्थान कायम राखलं आहे. ऑलिम्पिकनंतर बिंद्रा एकही स्पर्धा खेळलेला नाही. या दोघांशिवाय डबल ट्रॅप प्रकारात रंजन सोढीने अव्वल क्रमांक पटकावलं आहे.

close