रिवाईन्ड 2008 – बॉलिवुडची फॅशन

December 31, 2008 3:36 AM0 commentsViews: 13

हॉलिवुडमधून एखादी फॅशन बॉलिवुडमध्ये उचलली जाते. आणि एकदा का बॉलिवूडमध्ये ती फॅशन आली की लोकांना ती फॅशन उचलायला वेळ लागत नाही. वेध घेऊया बॉलिवुडनं यावर्षी बाजारात आणलेल्या फॅशनवर.होणार होणार म्हणत अखेर आमिर खानचा ' गजनी ' सिनेमा रिलीज झाला..अर्थात या सिनेमाची उत्सुकता ही आधीपासूनच होती मग कधी ती आमिरच्या एट पॅक अँब्सनं असू दे किंवा त्याच्या ' गजनी ' हेअरकटनं. आमिरच्या फॅन्सनी त्याचा हा हेअरकट कॉपी केला नाही तरच नवल. आमिरसारखीच शाहरुखच्या फॅन्सची तर्‍हा याहून काही वेगळी नव्हती. ' रबने बना दी जोडी 'मधला शाहरुखचा राज चाहत्यांना आवडला.म्हणूनच फॅशन स्ट्रीटवर जेव्हा त्याचे टीशर्टस विकायला आले तेव्हा चाहत्यांनी ते आवर्जुन खरेदी केले. शेवटी त्यांच्या सुपरस्टारची ती ओळख आहे मग ती एखाद्या सिनेमासाठीच का असेना. अगदी फॅशन इंडस्टीवर आधारित असलेल्या फॅशन सिनेमातले कपडेही फॅशन स्ट्रीटवर सर्रास मिळू लागलेत. आणि ते घेतलेही जातात कारण पार्टीवेअर म्हणून त्याला चांगलीच पसंती मिळू लागलीये. दोस्तानामधल्या जॉनच्या या टीशर्टनं सगळ्यांचंच लक्ष वेधलं, हा टीशर्ट तुम्हालाही आता घालता येईल. कारण तो ही फॅशन स्ट्रीटवर उपलब्ध आहे. थोडा प्यार थोडा मॅजिक या राणी मुखर्जीच्या सिनेमातले तिचे स्कर्टस ही इथं मोठ्या संख्येनं उपलब्ध आहेत.केवळ कपडे किवा हेअरकटच नाही तर यावर्षी हिरो हिरोईननं सिनेमात घातलेल्या लहानसहान वस्तूही बाजारात उपलब्ध आहेत. हिमेश रेशमियाच्या चर्चित कर्ज सिनेमातली उर्मिला मातोंडकरची ग्लॉसी टोपी यापैकीच एक. 2008 हे वर्ष फॅशन इंडस्ट्रीसाठी तसं बरं गेलं..पण सर्वसामान्यांची फॅशन पंढरी मानल्या जाणार्‍या या रस्त्यांवरचं हा फुललेला बाजार आणि इथली वर्दळ पाहीली तर ही फॅशन सर्वसामान्यांना आवडू आणि परवडू लागलीये हे मात्र खरं.

close