सायना नेहवाल ठरली सर्वोत्तम खेळाडू

December 9, 2008 4:04 PM0 commentsViews: 1

9 डिसेंबरबॅडमिंटनमधून भारतीय क्रीडा क्षेत्राला एक खुशखबर आहे. यावर्षी चांगली कामगिरी करत भारताची युवा बॅडमिंटनपटू सायना नेहवालनं जागतिक क्रमवारीत 10 वं स्थान पटकावलं आहे. तिच्या या उत्तम कामगिरीची दखल जागतिक बॅडमिंटन फेडरेशनकडूनही घेतली गेली आहे. आणि यावर्षीची सर्वोत्तम होतकरू खेळाडू म्हणून तिचा गौरव करण्यात आला. 18 वर्षीय बॅडमिंटनपटू सायनासाठी 2008 हे वर्ष स्वप्नंवत ठरलंय. बीजिंग ऑलिम्पिकमध्ये तिनं क्वार्टर फायनलपर्यंत मजल मारली. आणि पहिलंच ऑलिम्पिक खेळणा-या सायनानं संपूर्ण जगाला आपल्या कामगिरीची दखल घ्यायला भाग पाडलं. चायनीज तैपेई ओपनमध्ये तीनं जेतेपद पटकावलं. आणि यानंतर ख-या अर्थानं सुरू झाला तिच्या यशाचा धडाका. कॉमनवेल्थ युथ गेम्स आणि वर्ल्ड ज्युनियर्स बॅडमिंडन चॅम्पियनशिप या दोन स्पर्धा लागोपाठ तिनं आपल्या नावावर केल्या. तिचं हेचं यश लक्षात घेऊन जागतिक बॅडमिंटन फेडरेशनकडून तिला सर्वोत्तम होतकरू खेळाडू म्हणून गौरवण्यात आलं आहे. सायनाबरोबरच आणखी तीन होतकरू बॅडमिंटनपटूंचा या सन्मानासाठी विचार करण्यात आला होता. पण सोलमध्ये झालेल्या बैठकीत सायनाच्या नावावर एकमतानं शिक्कामोर्तब करण्यात आलं.

close