राहुल गांधींचा करिष्मा

December 9, 2008 4:30 PM0 commentsViews: 3

9 डिसेंबर दिल्लीकाँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी,पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यानंतर काँग्रेसला आता नवीन नेता मिळाला आहे. आणि तो नेता म्हणजे राहुल गांधी.मिझोरम, दिल्ली आणि राजस्थानमध्ये काँग्रेसनं बाजी मारली. आणि सगळीकडे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला. या जल्लोषात सगळ्यांच्या तोंडी एकच नाव होतं ते म्हणजे युवराज राहुल गांधींच. काँग्रेसनं मिळवलेल्या या विजयात राहुल फॅक्टर महत्वाचा ठरला आहे. विधानसभेच्या निवडणुकांमध्ये सोनिया गांधींपेक्षा राहुल गांधींनीच जास्त प्रचार सभा घेतल्या. राजस्थान,दिल्ली,मिझोरम या तिन्ही राज्यात काँग्रेस सत्तेवर आली. राजस्थानमध्ये तर त्यांनी भाजपच्या हातून सत्ता खेचून आणली.छत्तीसगड, मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसच्या जागांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.त्यामुळेचं आता कार्यकर्त्यांबरोबरच वरिष्ठ नेतेही या विजयाचं श्रेय राहुल गांधींना देत आहेत.

close