मुंबईवर हल्ला करणा-या दहशतवाद्यांचे फोटो

December 9, 2008 4:48 PM0 commentsViews: 2

9 डिसेंबर मुंबईमुंबईवर हल्ला करणा-या दहशतवाद्यांचे फोटो आयबीएन-लोकमतकडे आहेत. त्यांच्याकडे मिळालेल्या आयकार्डवरून त्याचा पाकिस्तानशी संबंध असल्याचं सिद्ध होत असल्याचं सांगण्यात येत आहे. 26/11ला सीएसटी , ताज आणि ओबेरॉयवर हल्ला करणारे हे दहशतवादी आहेत. त्यांची नावही जाहीर करण्यात आली आहेत. सीएसटी रेल्वे स्टेशनवर गोळीबार करणारे होते. मोहम्मद अजमल, मोहम्मद आमीर कसब आणि इस्माईल खान. तर ताज हॉटेलमध्ये घुसणारे होते हाफीज अरशाद अब्दुल रेहमान बडा, जावेद अबू अली, शोएब-नारोवाल, नझीर अबू उमर, तर नरिमन हाऊसवर नासीर -अबू उमर, अबू अक्सा- मुलतान. तर ओबेरॉय हॉटेलमध्ये घुसलेले दहशतवादी होते अब्दुल रेहमान- अब्दुल रेहमान चोटा, फहादउल्ला- अबू फहाद याच दहशतवाद्यांनी मुंबईला तब्बल 3 दिवस अक्षरश: वेठीला धरलं होतं.

close