आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीचे नवे नियम

December 9, 2008 5:07 PM0 commentsViews: 7

9 डिसेंबर केप टाऊनआंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीची एक महत्वाची बैठक नुकतीच दक्षिण आफ्रिकेतल्या केप टाऊनमध्ये पार पडली. सुरक्षेच्या कारणांवरून गेल्या काही काळात क्रिकेटच्या अनेक स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या होत्या, या विषयावरच या बैठकीत चर्चा करण्यात आली. आयसीसीच्या गुन्हे अन्वेषण आणि सुरक्षा समितीची भूमिका ही कोणत्याही दौ-या अगोदर देशातील सुरक्षा व्यवस्था ठरवण्यासाठी व्यापक करावी असा प्रस्तावही या मीटिंगमध्ये करण्यात आला. त्याचबरोबर वंशभेदाविरुद्धचे नियमही सुरू करण्याचं या बैठकीत ठरवण्यात आल्याचं समजतं. तसंचआयसीसीच्या नियोजित दौ-यांबद्दलही या बैठकीत चर्चा झाली.

close