हिरव्यागार गावाची गोष्ट (भाग : 3 )

January 5, 2009 4:12 AM0 commentsViews: 68

केवळ शेती करून भागणार नाही हे ओळखूनच हिवरे गावानं दुग्धव्यवसायाकडे लक्ष दिलं आहे. हिवरे गावात अहिल्याबाई आणि मुंबादेवी या दोन डेरी चालवल्या जातात. रोज सकाळी गावातून 800 लीटर दुधाचं कलेक्शन होतं. दुधाचं वाढतं उत्पादन ब्रॅण्डिंग होण्याच्या मार्गावर आहे. 72 च्या दुष्काळानंतर गावातआलेल्या दारूची जागा आता पुन्हा दुधाने घेतली आणि इतिहासाची चाकं पुन्हा फिरवली गेली आहेत. गावातली गरीब आणि श्रीमंतांमधली दरी कमी होत आहे. ही हिरवीगार संस्कृती बघण्यासाठी रोज हिवरेबाजारात रांगा लागतात. इथे कोणताही खर्च न करता रस्ताही बनवला जात आहे. हिवरेबाजारात ही जिद्द दिसते लोकांच्या सहभागातून. लोकांना गरज वाटेल तेव्हा इथे वर्षातून कितीहिवेळा ग्रामसभा भरते. इथे लग्नापूर्वी एचआयव्हीचीही टेस्ट करण्यात सक्तीची करण्यात आली आहे. इथे भांडणांच्या गोष्टी होत नाहीत. भांडणं झाली तरी गावातले प्रश्न कसे सोडवायचे हे लोकांना ठाऊक आहे. हिवरेबाजारच्या गोष्टीत माणसं खूश आहेत. ही गोष्ट इथे संपत नाही. ती कदाचित तुमच्या-आमच्या गावातही सुरू होऊ शकते. हिवरेबाजार. हिरव्यागार गावाची गोष्ट !

close