गृहखात्याने निधी वापरलाच नाही – जयंत पाटील

December 10, 2008 4:37 AM0 commentsViews: 24

10 डिसेंबर, मुंबईराज्याचा अर्थमंत्री असताना तत्कालीन गृहखात्याला पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी पुरेसे पैसे पुरवले होते. पण त्याचा वापरच झाला नाही, असा गौप्यस्फोट नवे गृहमंत्री जयंत पाटील यांनी केलाय. आयबीएन लोकमतला दिलेल्या खास मुलाखतीत पाटील यांनी हा खुलासा केला. "पोलीस विभागासाठी जे पैसे दिले गेले होते, ते सगळेच्या सगळे वापरले गेले नाहीत. अर्थ खात्यानं पोलीस विभागासाठी पुरेसे पैसे दिले होते, तेव्हा पैशाअभावी पोलीस दलाचं आधुनिकीकरण रखडलं, असं म्हणणं चुकीचं ठरेल " असं ते म्हणाले.

close