पनवेलजवळ भीषण अपघात, 9 ठार

December 10, 2008 5:04 AM0 commentsViews: 2

10 डिसेंबर, पनवेलमुंबई-पुणे महामार्गावर क्वालिस गाडी आणि ट्रकची धडक होऊन 9 जण ठार तर 3 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये पाच पुरुष, दोन महिला आणि दोन मुलांचा समावेश आहे. जखमींना लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. अपघात घडल्यानंतर ट्रक ड्रायवर मात्र फरार झालाय.रात्री दोनच्या सुमारास पनवेलजवळ हा अपघात झाला. अंधेरीहून शिंदे, टेकवडे आणि लोखंडे कुटुंब क्वालिसमधून पुण्याच्या दिशेने चालले होते. वसईकडे जाण्यार्‍या ट्रकने हॉटेल पिसपार्कजवळ या क्वालिसला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका जबरदस्त होता की क्वालिस पूर्णपणे उध्वस्त झालीय. पोलीस फरारी ट्रक ड्रायव्हरचा शोध घेत आहेत.

close