युद्धासाठी पाकिस्तान तयार – पाकिस्तान परराष्ट्रमंत्री

December 10, 2008 8:12 AM0 commentsViews: 3

10 डिसेंबरयुध्द लादल्यास कुठल्याही हल्ल्याला तोंड देण्यासाठी पाक लष्कर तयार असल्याचं पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मोहम्मद कुरेशी यांनी म्हटलं आहे. "पाकिस्तानला शांती हवी आह. पण जर कोणी युद्ध छेडलच तर आम्ही तयार आहोत. पाकिस्तानच्या सीमांचं रक्षण करणं ही आमची जबाबदारी आहे, आणि आम्ही ती पार पाडू" असं ते म्हणालेमुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान आणि भारतातले संबंध बरेच ताणले गेले आहेत. दहशतवाद्यांवर कारवाई करण्यासाठी पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढत आहे. कोंडोलिझा राईस यांनी त्यासंदर्भात पाकिस्तानला वॉर्निंग दिली होती. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी परराष्ट्रमंत्र्यांचं या विधानाविषयी आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

close