गप्पा अनुराधा डोणगावकर आणि प्रशांत भूतशी (भाग – 1)

January 12, 2009 4:54 AM0 commentsViews: 16

12 जानेवारीला स्वामी विवेकानंदांची जयंती असते. स्वामी विवेकानंदांचा देशातल्या तरुणांवर प्रचंड विश्वास होता. तरुणच देशाचं भवितव्य घडवू शकतात, तरुणच या देशाचे खरे आधारस्तंभ आहेत ही त्यांची धारणा होती. त्यामुळेच स्वामी विवेकानंदांची जयंती युवक दिन म्हणूनही साजरी केली जाते. युवक दिनाचं औचित्यसाधून ' सलाम महाराष्ट्र 'मध्ये दोन तरुण पाहुण्यांच्या गप्पा ऐकायला मिळाल्या. ' सलाम महाराष्ट्र 'मध्ये राष्ट्रीय कबड्डीपटू अनुराधा डोणगावकर आणि क्रीडा छायाचित्रकार प्रशांत भूत आले होते. राष्ट्रीय कबड्डीपटू असणा-याला अनुराधाला 2001-02 चा महाराष्ट्र सरकारचा शिवछत्रपती पुरस्कार मिळाला आहे. सतत 5 ते 6 वर्ष ती नॅशनल लेव्हलला बेस्ट प्लेअर राहिलीये. हैद्राबादला झालेल्या पहिल्या एशियनशिप चॅम्पिअनशिपमध्ये तसच कोलंबोला झालेल्या 10 व्या साऊथ एशियन गेम्समध्ये ती पहिली आलीय. इतर अनेक स्पर्धातूनही तिनं यश मिळवलं आहे. मुलाखतीच्या सुरुवातीलाच अनुराधानं युवकांना संदेश दिला. अनुराधा सांगते, " प्रत्येक मुलानं खेळलं पाहिजे. कारण खेळानं शरीर सुदृढ राहतं. आपल्यातली खिलाडू वृत्ती वाढते. खिलाडूवृत्तीमुळं बरंच काही साध्य करता येतं. चांगल्या आरोग्यासाठी तरी प्रत्येकानं खेळलं पाहिजे." अनुराधा डोणगावकर ही सारडा कन्या शाळेची विद्यार्थीनी आहे. ती सुरुवातीला जिम्नॅशियम खेळायची. जिम्नॅशियमची प्रॅक्टीस झाल्यावर ती उरलेला वेळ काय करायचा तर ती कबड्डीची मनसोक्त प्रॅक्टीस करायची. अशाप्रकारे अनुराधामधली कबड्डीची आवड निर्माण झाली. अनुराधाच्या स्मरणात तिचं पहिलं पारितोषिक चांगलंच लक्षात आहे. अनुराधा सांगते, " माझी ती पहिलीच कबड्डीची मॅच होती. आम्ही ती मॅच हरलो होतो. तरीही आमच्या टीमला उधळणारे घोडे बक्षीस म्हणून मिळाले होते. कारण ती मॅच अटीतटीची झाली होती. आयुष्यात एखादी गोष्ट आपल्याला मिळत कशी नाही यावर रडण्यापेक्षा ती वस्तू मिळवण्यासाठी आपण काय काय श्रम उचलले आहेत… ते आठवण्याचा प्रयत्न करा. कारण त्या कष्टांतून आपल्याला नक्कीच शिकायला मिळतं. ' सलाम महाराष्ट्र 'मध्ये आलेला क्रीडा छायाचित्रकार हाही जबरदस्त पॅशनेट आहे. जवळपास 10 वर्षांपासून ते क्रिकेट फोटोग्राफी करतो आहे.फोटोग्राफी ही त्याची पॅशन आहे आणि छंदही. भारतातल्या जवळपास सर्व वनडे आणि टेस्ट त्यांने कव्हर केल्या आहेत. विदर्भ क्रिकेट असोसिएशनचा तो अधिकृत छायाचित्रकार आहे. क्रिकेट फोटोग्राफीसाठी तो श्रीलंका, बांगलादेश, मलेशिया इथेही जाऊन आला आहे. " फोटोग्राफीसाठी मी खेळ या क्षेत्राची निवड केली. कारण मला उत्साही आणि उत्कंठावर्धक क्षण, क्षणार्धात टीपण्याची हौस होती. खेळामध्ये निरनिराळ्या प्रकारचे शॉट टीपण्याची मला आवड होती. म्हणून मी फोटोग्राफी खेळातून करण्याच्या निर्धार केला. खेळात क्रिकेट का, निवडलं तर भारतात सर्वात जास्त क्रिकेट हा खेळ लोकप्रिय आहे म्हणून. मॅचमध्ये माझं लक्ष क्रिकेटर्सच्या खेळीपेक्षा खेळाडंूच्या शॉटकडे असतं. शेवटी मला त्यात्या शॉटचं पॅशन आहे, " अशीही माहिती प्रशांतनं दिली. अनुराधा डोणगावकर आणि प्रशांत भूतशी मारलेल्या गप्पा ऐकण्यासाठी व्हिडिओवर क्लिक करा.

गप्पा अनुराधा डोणगावकर आणि प्रशांत भूतशी (भाग – 2) पाहण्यासाठी इथे क्लिक करा

close