भारतीय हवाई दलाला सतर्कतेचा इशारा

December 10, 2008 8:24 AM0 commentsViews: 17

10 डिसेंबरमुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधले संबंध ताणले गेलेत. याच पाश्‍र्वभूमीवर भारतीय हवाई दलाला सर्वोच्च सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. 7 वर्षात पहिल्यांदाच असे आदेश देण्यात आलेत. हवाई दलाच्या अधिकार्‍यांना सज्ज राहण्यास सांगण्यात आलंय. तर वरिष्ठ अधिकार्‍यांच्या सुट्‌ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. गुप्तचर यंत्रणेकडून भारतावर हवाई हल्ला होण्यचा इशारा दिला गेला आहे. भारताच्या महत्तवाच्या स्मारकांवर हा हल्ला होण्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला होता. त्या पार्श्वभूमीवर हा इशारा देण्यात आला आहे. हवाई दलाच्या एकूण कर्मचार्‍यांपैकी 30 टक्के कर्मचारी एका दिवशी रजेवर असतात. मात्र हे प्रमाण 10 टक्क्यांवर आणण्यात आलं आहे.

close