26/11 ला पोलिसांची जिगरबाज कामगिरी

December 10, 2008 8:52 AM0 commentsViews:

10 नोव्हेंबर, मुंबईअजित मांढरे 26 नोव्हेंबरला मुंबईवर अतिरेक्यांनी आत्मघातकी हल्ला केला. या हल्ल्याने अवघा देश हादरला.अत्याधुनिक हत्यारं, प्रचंड दारूगोळा आणि प्लॅनिंग करुन या अतिरेक्यांनी मुंबईत हैदौस घातला. अशा युद्धजन्य परिस्थितीत मुंबई पोलिसांनी जीव धोक्यात टाकून अतिरेक्यांशी सामना केला. आमचे रिपोर्टर अजित मांढरे यांनी मिळवलेल्या एका एक्सक्लुझिव्ह संभाषणात मुंबई पोलिसांनी अतिरेक्यांना कशी कडवी झुंज दिली, एनएसजी कमांडो येईपर्यंत मोर्चा कसा सांभाळून ठेवला आणि त्यात मुंबई पोलिसांना कसं यश आलं हे स्पष्ट होतंय. पण, त्यावेळी मुंबई पोलीसांनी गमावले ते कर्तव्य दक्ष अधिकारी. पोलिसांची ही जिगरबाज कामगिरी तुम्ही सोबतच्या व्हिडिओवर पाहू शकता.

close