गप्पा किशोरीशी (भाग : 3)

January 14, 2009 1:48 PM0 commentsViews: 5

मकरसंक्रांतीच्या निमित्तानं ' टॉक टाइम 'मध्ये प्रसिद्ध अभिनेत्री किशोरी शहाणे – वीज आली होती. पंजाबी लोक संक्रात कशी साजरी करतात, गजब हा खास तिळाचा पंजाबी पदार्थ याबद्दल ती बोलली. भरपूर लाडू खा, पण लगेच डायट करा असा सल्ला तिनं दिला. फिटनेसबद्दल जागृता हवी, शिवाय पॉझिटीव्ह अपरोच महत्त्वाचा आहे, असं तिनं सांगितलं. तिचा सीएबरोबरच अभिनयाचा अभ्यास सुरू होता. मात्र ऍक्टींगमध्ये जास्त इंटरेस्ट असल्यांनं त्यातच करिअर केलं. 11वीत असाताना प्रेम करूया खुल्लम खुल्ला हा सिनेमा आला. कॉमेडी करताना टायमिंग महत्त्वाचं असतं, असं सांगून काही धम्माल किस्सेही तिनं शेअर केले. अभिनय आणि भूमिकेचा अभ्यास महत्त्वाचा असतो, फॅमेली खूश तर करिअर सक्सेस, इच्छा असेल तर घर आणि करिअर अशा दोन्ही गोष्टी अगदी सहज साध्य होतात.

किशोरीच्या गप्पा ऐकण्यासाठी व्हिडिओवर क्लिक करा.

close