टेन्शन परीक्षेचं (भाग – 1)

January 15, 2009 11:39 AM0 commentsViews: 31

येणारे परीक्षेचे दिवस पाहता ' टॉक टाईम 'मध्ये ' टेन्शन परीक्षेचं ' या विषयावर कौन्सिलर डॉ.शुभा थत्ते बोलल्या. परीक्षेची तयारी, ताण, आहार, व्यायाम या सगळ्या मुद्द्यांवर त्या कार्यक्रमात बोलल्या. मुलांवर पालक आणि शिक्षकांचा ताण असतो. पालकांनी आपल्या मुलाची ऍबिलीटी लक्षात घेतली पाहिजे, मुलं दहावीत आलीत की पालकांचा सगळा वेळ मुलांवर लक्ष ठेवण्यात जातो. तर पालकांनी असं न करता मुलांचा कल लक्षात घेतला पाहिजे. त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रांची ओळख करून द्या. दहावी बारावीच्या परीक्षांना जीवन मरणाचा प्रश्न समजू नका, असंही त्या बोलल्या. आज काल मुलं सकाळी नीट नाश्ता करत नाहीत… लवकर उठत नाहीत पण सकाळी आपला मेंदू तल्लख असतो, मन एकाग्र होऊ शकतं आशा वेळी शरीराला प्रोटिन्स,कार्ब्रोहायड्रेट्स,कॅल्शियमची गरज असते, त्यामुळं मुलांनी पौष्टीक आणि पोषक नाश्ता घेणं गरजेच आहे असंही शुभा थत्ते यांनी सांगितलं. शुभा थत्ते यांचं मार्गदर्शन व्हिडिओवर ऐकता येईल.

close