गप्पा महेश जगतापशी

January 16, 2009 10:53 AM0 commentsViews: 2

' सलाम महाराष्ट्र 'मध्ये चित्रकार महेश जगताप आला होता. महेशची स्वत:ची स्वतंत्र अशी तीन आणि सामूहिक अशी 15 ते 16 चित्र प्रदर्शनं भरली आहेत. त्याच्या चित्रकलेसाठी अगदी लहान वयात त्याला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. पोर्ट्रेट्, लँडस्केप, ऍबस्ट्रॅक्ट अशी सर्व प्रकारची चित्र महेश काढत असला तरी सध्या महेशचं काम सुरू आहे ते विशेष करुन ऍबस्ट्रॅक्टवर. त्याला बेस्ट लॅन्डस्केप ऍवॉर्ड , बेस्ट फोटोग्राफी ऍवॉर्ड , बेस्ट पोर्टट्रेट ऍवॉर्ड ही मिळाला आहे. महेशचा रंगांचा, आकारांचा अभ्यासही उत्तम आहे. सलाम महाराष्ट्रमध्ये तो त्याच्या चित्रांविषयी आणि एकूणच चित्रकलेविषयी बोलला. ते तुम्हाला व्हिडिओवर पाहता येईल.

close