ट्रेकिंगची तयारी (भाग : 2)

January 16, 2009 11:47 AM0 commentsViews: 4

'टॉक टाईम 'मध्ये ट्रेकर अमोल देशपांडे ट्रेकिंगची तयारी या विषयावर बोलले. राजमाची, कर्नाळा अशा मुंबई जवळच्या वन डे पिकनिकच्या जागा त्यांनी सांगितल्या. ट्रेकिंगसाठी मानसिक आणि शारीरिक दोन्ही तयारी करणं आवश्यक असतं. बॅगमध्ये सामान भरताना जड सामान नेहमी वर आणि हलकं सामान तळाशी ठेवावं म्हणजे चालणं आरामदायी होतं, खाणं बरोबर घेताना त्याची न्युट्रिशियस व्हॅल्यू पहावी. हिमालयात ट्रेकला जाताना जसंजसे तुम्ही जमिनीपासून वर जाल तशी हवा विरळ होत जाते. अशावेळी तुमचं शरीर तापमानाशी लढतं असतं. तेव्हा शरीर सतत रिहाईड्रेट करणं आवश्यक आहे. त्यासाठी चॉकलेटस्, इलेक्ट्रॉलचं पॅकेट जवळ ठेवावं. ट्रेकसाठी जी उपकरणं वापरतात त्याची सुरक्षितता तपासून घेतली पाहिजे. शिवाय जी माणसं ही उपकरणं वापरतात त्यांना या गोष्टीचं ट्रेनिंग आहे का हे माहीत करून घेतलं पाहिजे,अशी महत्वाची माहिती अमोल देशपांडेने यांनी सांगितली. प्रत्येक मौसमात ट्रेकला जाता येतं. अमोल सांगतात, " पावसाळ्यातली हिरवळ डोळ्यांना सुखावते. पण जमीन निसरडी असते. हिवाळ्यात खूप थंडी पण ऊनही असतं. उन्हाळ्यात तुम्हाला वन्य जीवन पहाता येणार नाही. प्रत्येक सिझनला निसर्गाची वेगवेगळी रुपं पहायलामिळतात."ट्रेकिंगची तयारी या विषयावर ट्रेकर अमोल देशपांडे यांनी केलेलं मार्गदर्शन ऐकण्यासाठी व्हिडिओ क्लिक करा.

close