मिलिटरी अ‍ॅकडमीमध्ये बनावट उमेदवाराला अटक

December 10, 2008 11:33 AM0 commentsViews: 3

10 डिसेंबर, नवी दिल्लीइंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये एक गंभीर प्रकार उघडकीस आलाय. बनावट ओळख सांगून अकॅडमीत प्रवेश घेतलेल्या एकाला अटक करण्यात आलीय. यामुळे लष्करी अधिकार्‍यांना प्रशिक्षण देणार्‍या या संस्थेच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. गेल्या सहा महिन्यांपासून अ‍ॅकडॅमीमध्ये प्रशिक्षण घेणारा कॅडेट दीपक यादव हा दीपक नसून संजीव यादव आहे, असं प्रशासनाच्या लक्षात आलंय. त्याला 2005 मध्ये अकॅडमीतून काढण्यात आलं होतं. पण त्यानं खोट्या नावानं पुन्हा एकदा प्रवेश मिळवला होता. पण याबाबत आता अ‍ॅकडमीच्या अधिकार्‍यांनी हात झटकलेत. यादवनं आपला अपराध मान्य केलाय. त्याच्या मते कॅडेटच्या ओळख पडताळणीची जबाबदारी पोलिसांची असते.

close