16 : 9 फिल्म फेस्टिव्हल

January 18, 2009 5:20 PM0 commentsViews: 2

उषा प्रवीण गांधी कॉलेजऑफ मॅनेजमेन्टमध्ये अनोख्या फिल्म फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं होतं. हा फिल्म फेस्टिव्हल विद्यार्थ्यांचा विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी चालवलेला फिल्म फेस्टिव्हल होता. या फेस्टिव्हलमध्ये फक्त सिनेमा दाखवला जात नाही. तर मुलांना सिनेमा तयार करायला शिकवला जातो. आणि हे काम विद्यार्थीच विद्यार्थ्यांसाठी करतात. साध्या साध्या घटनांना फ्रेममध्ये कसं बंदिस्त करायचं याचं प्रशिक्षण दिलं जातं. उदाहरणार्थ… समजा तुमच्या हातून पेन्सिल पडली… पेन्सिल पडणं ही घटना लोकांसाठी सर्वसामान्य आहे. पण ती कॅमे-यात बंदिस्त करणं हे काम महा कठीण आहे. कॅमे-याचा अँगल नीट साधून विद्यार्थ्यांना हेच करावं लागतं. ते कसं ते ' 16 : 9 फिल्म फेस्टिव्हल ' च्या व्हिडिओवर क्लिक करून पाहता येईल.

close