वेगवेगळे हेअर कट (भाग : 3)

January 20, 2009 11:43 AM0 commentsViews: 114

टॉक टाइममध्ये या वेळचा विषय होता वेगवेगळे हेअर कट. याविषयावर हेअर स्टायलिस्ट रुक्मिणी होनावर बोलल्या. आपल्या व्यक्तिमत्वात आपल्या केसांचा सहभाग मोठा असतो. म्हणूनच रुक्मिणी होनावर यांनी विविध चेहरेपट्टींनुसार करण्यात येणा-या हेअर कट विषयी तसंच केसांची निगा कशी राखावी यावर सांगितलं. " आपल्या चेहर्‍याचे गोल,ओव्हल,उभा चेहरा,चौकोनी असे प्रकार असतात आणि त्याला सुट होणारे हेअर कटही वेगवेगळे असतात. त्यामुळे योग्य सलोन निवडणं महत्त्वाचं आहे.जिथे तुमच्या चेहर्‍याबरोबरच तुमची पर्सनॅलिटी, आवड, केसांचं टेक्शर या सगळ्या बाबींचा विचार करून हेअर कट केला जाईल. शिवाय सलोनच्या स्टाफची विश्वासार्हायताही तपासली पाहिजे. एखादा हेअर कट केल्यानंतर तो घरी कसा मेन्टेन्ड करायचा हेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे, " असं रुक्मिणी होनावर यांनी सांगितलं.केसांचं आरोग्य चांगलं रहाण्यासाठी आपला आहारही चांगला असला पाहिजे. केस कापण्या आधी केस स्वच्छ धुतलेले पाहिजेत. ऑयली केसांमुळे हेअर कट नीट होत नाही. या शिवाय केसांच्या मुळांचं आरोग्य जपलं पाहिजे. कंडिशनर वापरला पाहिजे अशा अत्यंत महत्त्वाच्या टीप्स रुक्मिणी होनावर यांनी दिल्या. ' टॉक टाइम 'मध्ये रुक्मिणी होनावर यांनी ' वेगवेगळे हेअर कट ' याविषयावर सांगितलेली माहिती व्हिडिओवर पाहता येईल.

close