मसूद अझरला भारताकडे सोपवण्यास पाकचा नकार

December 10, 2008 11:44 AM0 commentsViews: 3

10 डिसेंबरमौलाना मसूद अझरला भारताकडे सोपवायला पाकिस्ताननं नकार दिलाय. जैशचा संस्थापक असलेला मसूद अझर हा संसंदेवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी भारताला हवा आहे. अझर बरोबरचं भारताने आणखी काही आरोपींची मागणी पाकिस्तानकडे केली आहे. त्यापैकी मसूद अजहर ' लष्कर- ए- तोयबा ' चा सहसंस्थापक हफीज महम्मद सईद 1993 च्या बॉम्बस्फोटातील कुख्यात आरोपी दाऊद इब्राहिम, छोटा शकील, टायगर इब्राहिम मेमन, अयुब मेमन, अब्दुल रझ्झाक यांचा समावेश आहे. सईद सलाऊद्दीन या हिजबुल मुजाहिद्दीनचा संस्थापकाचा तसंच इतर खलिस्तानी अतिरेक्यांचाही या यादीत समावेश आहे.26 / 11 पासून दहशतवादाला लगाम घालण्यासाठी पाकिस्तानवरचा आंतरराष्ट्रीय दबाव वाढत आहे. नुकत्याच अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री कोंडोलिझा राईस यांनी पाकला कडक शब्दात तंबी दिली होती. त्या पार्श्वभूमीवर पाकिस्ताननं दहशतवाद्यांविरुद्ध मोहीम छेडली आहे. त्यांनी मौलाना मसूद अझरला नजरकैदेत ठेवलं असून मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड रेहमान लखवी यालाही ताब्यात घेतल्याचा दावा पाकिस्ताननं केला होता. मात्र दहशतवाद्यांना ताब्यात घेतलं तरी त्यांना भारताकडे सोपवणार का ? आणि सोपवलं नाही, तर पाकिस्तामध्ये या अतिरेक्यांवर खरंच कारवाई होईल का ? हे प्रश्न या निमित्तानं समोर आले आहेत.

close