नवी मुंबईतील पामबीच मार्गावर सात डबल डेकर पुलांचा प्रोजेक्ट

December 10, 2008 12:00 PM0 commentsViews: 9

विनय म्हात्रे10 डिसेंबर, नवी मुंबईनवी मुंबईत इंटरनॅशनल विमानतळ होतय. मुंबई ते उलवा विमानतळ हा मार्ग सोपा व्हावा, यासाठी नवी मुंबई महापालिकेनं शहरातील पामबीच मार्गावर आधुनिक सात डबल डेकर पूल उभारण्याचं काम हाती घेतलंय. यामुळे मुंबई ते नवी मुंबई एअरपोर्टचा मार्ग तर सुकर होईलच तसंच नवी मुंबईच्या वाहतुकीचा प्रश्न ही सुटणार आहे.नवी मुंबईतील पामबीच रोड आता एक नवा प्रोजेक्ट उभा राहणार आहे. हा प्रोजेक्ट नवी मुंबई विमानतळासाठी महत्त्वाचा आहे. या मार्गावरील सातही जंक्शनवर डबल डेकर पूल उभारले जाणार आहेत. वाशीतील अरेंजा सर्कलवरील पूल सर्वात मोठा असणार आहे. पामबीच रोड वाशी रेल्वे पूलापासून सुरु होणार तो थेट ठाणे- बेलापूर रोडला जोडला जाणार आहे तर याच पुलावरुन वाशी – तुर्भे पूल उभारला जाणार आहे. या पुलाला शहरातले सर्व महत्त्वाचे रस्ते जोडले जाणार आहेत. तसंच मुंबई – पुणे मार्गालाही जोडला जाणार आहे. या डबल डेकर पुलामुळे शहरातील वाहतुकीचा ताण कमी होणार आहे.नवी मुंबईत होणार्‍या या नव्या प्रकल्पामुळे तिथल्या विकासाला आणखी चालना मिळणार आहे. 9 किलोमीटरच्या या मार्गावर सात डबल डेकर पूल उभारले जाणार आहेत. 460 कोटी रुपये खर्च येणार असून यामुळे वाशी ते एअरपोर्टचं अंतर 20 मिनिटाचं राहणार आहे. ' हे मुंबई रिजनच्या दृष्टीनं केलंय. मुंबईसाठी गरजेचं आहे. या सातही पूलाचं कामं अद्ययावत पद्धतीचं असणार आहे. परदेशी तंत्राचा वापर यामध्ये केला जाणार आहे. प्लॅन इलेव्हन्ट तयार केलेत. स्टील आणि कॉक्रीट कंपोज करणार ही विशेषता आहे '. असं पालिकेचे मुख्य अभियंता मोहन डगांवकर यांनी सांगितलं. वाढत्या अपघातांमुळे त्रस्त झालेले पोलीस मात्र या प्रोजेक्टमुळे सुखावलेत. ' वेग जरी वाढला तरी अपघातांची संख्या कमी होवू शकते ', असं पोलीस कमिशनर रामराव वाघ यांनी सांगितलं.हा प्रकल्प 460 कोटी रूपयांचा आहे. त्यापैकी 230 कोटी रुपये केंद्राच्या जेएनयुआरएमच्या माध्यमातून मिळणार आहेत. त्याचं एक शिष्टमंडळ लवकरच या प्रोजेक्टचा आढावा घेणार आहे.

close