गप्पा योगेश सदरेशी

January 22, 2009 2:53 PM0 commentsViews: 4

सलाम महाराष्ट्र ' मध्ये रॉक क्लायम्बर योगेश सदरे आला होता. त्याचबरोबरीनं नागपुरात हजरत बाबा ताजुद्दीन यांच्या उरूसाचीही सफार झाली. ' सलाम महाराष्ट्र'ची सुरुवात एका धार्मिक कार्यक्रमाने केली. नागपुरात हजरत बाबा ताजुद्दीन यांचा 86 वा उरूस साजरा करण्यात येतोये. हा उत्सव पुढचे सात दिवसांत साजरा केला जाणार आहे. या निमित्ताने नागपूरचे ब्युरो चीफ प्रशांत कोरटकर यांनी या उरूसाबद्दल माहिती दिली. नागपूरातल्या मोठा ताजबाग या ठिकाणी ताजुद्दीन बाबांचं वास्तव्य होतं. याचं ठिकाणी बाबांची मदार आहे. आणि तिथे हा उरूस साजरा करण्यात येतो. या उरुसाला धार्मिकबरोबर खूप मोठं सामाजिक महत्त्व आहे. या उरुसासाठी संपूर्ण देशातूनचं नाही तर देशाबाहेरूनही भाविक येतात. इथे येणारे भाविक बाबांच्या मदारीवर चादर वाहतात. आणि मन्नतीचा धागाही बांधतात. यामुळे नागपूरला अजमेरचं महत्त्व प्राप्त झालं आहे. म्हणून नागपूरला मिनी अजमेरही म्हणतात. सलाम महाराष्ट्रच्या निमित्तानं मदारीच्यापर्यंतची दृश्य बघायला मिळाली. या संस्थानाच्या प्रमुखांशीही बातचीत करायला मिळाली. यावेळी त्यांनी सांगितलं की हा उरूस फक्त धार्मिक नाही तर तो सामाजिक ऐक्याचं प्रतिक आहे. या उरूसात हिंदू मुस्लिम आणि इतर धर्माचेही भावित तितक्याचं श्रध्देने येतात. 26 च्या हल्ल्यानंतर पहिल्यांदाचं हा उरूस होतोयं. त्यामुळे इथे सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. सलाम महाराष्ट्रमध्ये एका रॉकिंग विषयावर बोलण्यासाठी योगेश सदरे रॉकक्लायम्बर आला होता. योगेश गेल्या दहा वर्षांपासून रॉकक्लायबिंग करतात. रॉकक्लायबिंग म्हणजे बर्‍याचं जणांना धडकी भरते. पण आज योगेश्नं खूप साध्या आणि सोप्या शब्दात रॉकक्लायबिंग सांगितलं. रॉकक्लायबिंग करताना आपण कशी तयारी करावी लागते बद्दल सांगताना तो सांगतो, " रॉकक्लायबिंग करताना शारीरिक आणि मानसिक फिटनेस महत्त्वाचा असतो. त्याचं बरोबर डिसीजन मेकींग पॉवर ही खूप महत्वाची असते. काहीही प्रॉब्लेम आले तरी सुध्दा पॅनिक न होता शांत रहावं. त्याचबरोबर रॉकक्लायबिंग करताना प्रत्येक प्रदेशानुसार तिथल्या वातावरणाचा अभ्यास करणं महत्त्वाचं असतं. आणि त्यात सातत्य हे तितकचं महत्वाच असतं. " सध्या भारतात ऍडव्हेंचरस स्पोर्ट्स म्हणून डेव्हलप होतोय. पण पुरेसं फंडिंग आणि प्रोत्साहन नसल्याने त्याच्याकडे कोणी करिअर म्हणून बघतं नाहिये. त्याचं बरोबर टेक्नोलॉजीचा विचार करता परदेशातल्या आणि भारतातल्या पध्दतींमध्ये खूप फरक जाणवतो. पण आता काही कंपन्यांच्या तर्फे रॉकक्लायबिंग चं प्रशिक्षण देण्यात येतयं, अशी महत्त्वाची माहिती योगेशच्या बोलण्यातून समजली. सो!!!! या विकएंडला नुसतचं फिरण्यापेक्षा या ऍडव्हेंचरस स्पोर्ट्सचा नक्की अनुभव घ्या.

close