ट्रेन्डस् सलवार कमीजचे

January 23, 2009 9:59 AM0 commentsViews: 105

' टॉक टाइम ' चा विषय होता ट्रेन्डस् सलवार कमीजचे. याविषयावर बोलण्यासाठी बुटिक ओनर राजेश केतकर आले होते. राजेश केतकर यांनी सलवार कमीजच्या इतिहासाविषयी सांगितलं. ते सांगतात, " पंजाबी ड्रेस म्हणजे सलवार-कमीज हा मूळचा उत्तरेकडचा आहे. सिनेमातून तो आपल्याकडे आला. आणि आता तर कोणत्याही प्रांतापुरती तो मर्यादीत न राहता संपूर्ण देशातला महिला वर्ग पंजाबी ड्रेसचा वापर करत आहे. साडीला पर्याय म्हणून सलवार कमीज आलाये. त्यातल्या सलवारमुळे हालचाल करण्यास सोपं होतं. यामुळं वर्किंग वुमन मध्ये तो लोकप्रिय झालाये. " मुंबईच्या हवामानात सलवार कमीज वापरायच्या असतील तर ते कॉटन किंवा टेरी कॉटन असल्या पाहिजेत. कारण ते धुवायला सोपे जातात. प्रत्येकीनं अंगकाठी काय आहे त्यानुसार आपला सलवार कमीजचा प्रकार निवडायचा. सलावर-कमीज घातल्यावर एका खांद्यावर उभा दुपट्टा घेतला तर घालणारी व्यक्ती उंच दिसते. स्लिव्हलेस पंजाबी ड्रेस घातल्यावर बांधा सरळ दिसतो. त्यामुळे पंजाबी ड्रेस वापरणा-या प्रत्येकीनं आपापल्या शरीरातल्या उणिवा ओळखून त्यानुसार कपडे निवडले तर व्यक्तिमत्त्व खुलून दिसतं.आत्मविश्वास वाढतो, असं राजेश केतकरांनी सांगितलं. तसंच कपडे शिवताना आपल्या टेलरला योग्य सुचना दिल्या पाहिजेत असा सल्लाही त्यांनी दिला.

close