युथ आयकॉन रोहित सावंत : युथ ट्युब ( भाग 1 )

January 26, 2009 12:33 PM0 commentsViews: 4

युथ आयकॉन रोहित सावंत : युथ ट्युब ( भाग 1 )युथ ट्युबमध्ये आपण भेट घेतली रोहित सांवत याची. रोहित यावेळचा स्पेशल गेस्ट आहे कारण त्याने 26/11 च्या मुंबई हल्ल्यातील थरार अनुभवलायं. रोहित सावंत एनजी कमांडो आहे. मुंबईतल्या नरिमन हाऊस इथल्या कारवाईत त्याने भाग घेतला होता. रोहित सांगतो, कोणत्याही कठीण पारिस्थितीत कारवाईसाठी सदैव तत्पर राहणं हे कमांडोचं कर्तव्य आहे. मिशन नरिमन हाऊसवर जाण्यापूर्वी मनात थोडीशी भीती होती. पण ज्यावेळी हा हल्ला दहशतवादी हल्ला आहे हे कळल्यावर आम्ही मिशन फते करण्यासाठी तयार झालो. सीमा रक्षणासाठी आर्मी असते तसंच नागरी भागात जी कारवाई पोलीस यंत्रणेच्या हाताबाहेरची असते त्यावेळी ती सिट्युएशन हाताळायला कमांडोंना पाठवलं जातं. कमांडोंना विशिष्ट प्रकारचं ट्रेनिंग दिलेलं असतं त्यामुळे हॉस्टिजस, अतिरेकी हल्ला अशा कारवाईत कमांडोंना बोलवलं जातं.रोहित सांगतो लहानपणापासून त्याला ऑफिस वर्कमध्ये इन्ट्रेस नव्हता. त्याचा कल एनसीसी, ट्रेकिंग याकडेच जास्त होता. एनसीसीत असताना रोहितने दिल्लीतल्या परेडमध्ये भाग घेतला होता आणि त्यांची ऑल इंडिया बेस्ट कॅडेड म्हणून निवड झाली होती. रोहितचे वडीलही पोलीस खात्यात आहेत.तसंच आर्मीमधलं मॅन टू मॅन ऑपरेशन आणि समोरासमोर फाईट करण्याची जबरदस्त इच्छा असल्यामुळे रोहित कमांडो झाला. रोहित सांगतो, देशातील प्रत्येक नागरिकांनी देशासाठी काहीतरी केलं पाहिजे. केवळ आर्मी, पोलीस यांचं काम देशाचं रक्षण करणं आहे म्हणून ती जबाबदारी त्यांचीच आहे असं समजणं चुकीचं आहे. रोहित सांगतो कोणतही काम करताना कामचं टेन्शन घेऊन काम करू नका.बिनधास्त रहा.

close