माझा भारत देश … (भाग – 3 )

January 26, 2009 4:43 PM0 commentsViews: 25

या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन… हे वाक्य कुठंतरी ऐकल्यासारखं वाटतंय… हे तर भारताच्या प्रतिज्ञेचं आहे. या प्रतिज्ञेच्या वाक्याला संगीतला नेमबाज नवनाथ फडतरे अगदी खरा उतरतो. नवनाथनं आतापर्यंत अनेक पदकं देशाच्या आणि स्वताच्या नावावर केलीयेत. त्यामध्ये 22आंतराराष्ट्रीय स्पर्धांत 6 सुवर्ण, 1 रजत, 4 कांस्य तर 100 हून अधिक वैयक्तिक पदकं आहेत. " आज मी जो काहीआहे ते मला सगळं शुटिंगने दिलंय आणि एखाद्या व्यक्तीला व्यसनाची सवय असेल तर त्याला ते केल्याशिवाय रहावत नाही. शुटिंग हे व्यसन ते सुटत नाही, " नवनाथ कृतज्ञ होऊन म्हणतो.नवनाथचे हे प्रयत्न ध्येयानं झपाटलेले आहेत. " मी 2006 मध्ये वर्ल्ड चॅम्पिअन झालेलो आहे. मला वैयक्तिक सुवर्णपदक मिळालेलं आहे, " नवनाथ अभिमानानं सांगत होता. नेमबाजीतला अभिनव बिन्द्राचा खरा वारसदार वाटावा असा नवनाथ फडतरे आहे. मुळचा सांगलीचा असणारा नवनाथ त्याच्या गावातला तो पहिलाच नेमबाज आहे. पण त्याच्यतल्या खेळाडूसाठी पोषक वातावरण नव्हतं. तरीही त्यानं गावातल्या शुटिंग रेंजवर प्रॅक्टीस करून नाव लौेकीक मिळवला आहे. तरीही त्याच्या मनातून काही आंतरराष्ट्रीय शुटिंग रेज जात नाही. नवनाथ सांगतो, " परदेशातले शुटिंग रेंज खूप चांगल्याप्रकारे तयार केलेले आहेत. तिथलं इलेक्ट्रॉनिक टार्गेट, अत्याधुनिक सुविधा जर भारताल्या नेमबाजांना मिळाल्या तर त्यांच्या आयुष्याचं सोनं होईल. " नवनाथचं आता एकच लक्ष्य आहे ते ऑलम्पिक स्पर्धांकडे. 2010 मध्ये येणा-या एशियन गेम, कॉमनवेल्थ आणि वर्ल्ड चॅम्पियन या स्पर्घांमुळं ते साल नवनाथच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधार्‍या माणसांचा मान ठेवेन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन… या प्रतिज्ञेच्या ओळीला विसरून तरी कसं चालेल. आणि त्या प्रतिज्ञेच्या ओळीत फिट्ट बसणा-या तुषार गांधीनाही विसरून चालणार नाही. " मी पुस्तक लिहिलंय तरी मला कोणी लेखक म्हणून ओळखत नाहीत. मी सिनेमांमधून कामं केलेली असूनही अभिनेता ही माझी ओळख काही एस्टॅब्लिश होत नाहीये. माझी एकच ओळख आहे आणि ती म्हणजे बापूंचा पणतू, " तुषार गांधी सांगत होते. तुषार गांधी गेली अनेक वर्षं महात्मा गांधी आणि त्यांच्या विचारांचा प्रसार करत आहेत. " बापूंच्या विचारांचा प्रसार मी केवळ त्यांचा पणतू म्हणून करत नाही. मी आज नॉनव्हेज खातो, जीन्स घालतो, मी काही बापूंचा क्लोन नाही. पण बापूंनी अहिंसा आणि विश्वशांतीचा संदेश दिला आहे त्याची आजच्या काळात नितांत गरज आहे. कारण ते परिणामकारक आहे, " असं तुषार गांधींचं मत आहे. या संदेशांचा प्रसार होण्यासाठी आधुनिक माध्यमांचा वापर केला पाहिजे, असं तुषार गांधींना वाटत आहे. त्यावेळी त्यांनी एक उत्तम उहारण दिलं. ते सांगतात, " मी एकदा एका भारतातल्या शाळेत गेलो होतो. त्या शाळेतल्या नर्सरीच्या वर्गाबाहेर बापूंचा फोटो लावला होता. दोन छोट्या मुली त्या पुतळ्याच्या शेजारी खेळत होत्या. त्यातली एक दुसरीला म्हणाली, " हे म्हातारे आजोबा कोण आहेत ? ' दुसरीनं उत्तर दिलं, " अगं हे आजोबा बापूजी आहेत. यांनी मुन्नाभाईला सुधरवलं आहे." मी त्या मुलीच्या उत्तरांनी भारावून गेलो. बापूंचे विचार जर अशा मार्गानं पोहोचत असतील तर अजून काय हवंय. बापूंची अवतारी पुरुष ही ओळख मला कधीच आवडणार नाहीये. " गांधींकडून गांधींना मिळालेला वारसा आणि जीवनमूल्यांचा प्रवास जपण्यासाठी तुषार गांधी प्रयत्न करणार आहेत.

close