टॅक्स प्लॅनिंग ( भाग 1)

January 26, 2009 2:59 PM0 commentsViews: 4

टॅक्स प्लॅनिंग ( भाग 1)जानेवारीचा शेवट जवळ आला की बहुतेक सगळ्यांच्या ऑफिसमधून मागणी सुरू होते ती गुंतवणुकीच्या रिसीट्स आणि माहिती देण्याची. अशावेळी पुरेशी गुंतवणूक झाली नसेल तर मग शेवटच्या वेळची गुंतवणूक करण्याची धावपळ सुरू होते. यावेळी काय करायचं, कोणती काळजी घ्यायची याविषयी यावेळच्या श्रीमंत व्हा ! कार्यक्रम माहिती दिली गेली. चार्टर्ड अकाउन्टन्ट वरदराज बापट आणि मिलिंद ग्रामोपाध्ये यांनी यावेळी मार्गदर्शन केलं.या चर्चेतले हे काही मुद्दे.

टॅक्स प्लॅनिंगयोग्य गुंतवणूक केली तर संपूर्ण टॅक्स बेनेफिटचा फायदा घेता येतो.गुंतवणूक करताना फक्त 1 लाखांची मर्यादा पूर्ण करायची म्हणून गुंतवणूक करू नका. गरज लक्षात घेऊन विचारपूर्वक गुंतवणूक करा.एखादी गुंतवणूक करताना तुमची उद्दिष्टं पूर्ण होत आहेत का ते तपासून घ्याटॅक्स सवलतींचा विचार करतानाच त्या गुंतवणुकीतून मिळणा-या रिटर्न्सचाही विचार कराखाली दिलेल्या पर्यायांमध्ये टॅक्स बेनिफिट आहे- नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट- पीपीएफ- इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम्स- इन्शुरन्स- पेन्शन पॉलिसीकरमुक्त उत्पन्न मर्यादा 2008-09साठीपुरुष – रु.1.5 लाखस्त्रिया – रु.1.8 लाखज्येष्ठ नागरिक – रु.2.25 लाख

close