बायपास करताना (भाग – 1)

January 27, 2009 1:37 PM0 commentsViews: 8

'टॉक टाइम'चा विषय होता बायपास करताना… या अत्यंत नाजुक विषयावर हृदयरोग तज्ज्ञ डॉ.अजय चौघुले बोलले. हृदयाची रचना ही गुंतागुंतीची असते. हृदयाला रक्त पुरवठा करणार्‍या रक्त वाहिन्यांमध्ये जेव्हा अडथळा निर्णाण होतो तेव्हा शस्त्रक्रियेद्वारे वेगळा मार्ग शोधण्यात येतो त्याला बायपास म्हणतात. बायपास केल्यानंतर आपली जीवनशैली बदलणं आवश्यक असतं. तसंच डायबेटीस, हाय ब्लडप्रेशर, ताण यासर्व गोष्टींमुळे ह्रदयरोग होण्याचे धोके असतात. शरीरातल्या प्रत्येक अवयवाच्या संरक्षणासाठी आवरण(पेरिकार्डियम)असतं. हृदयाची जागा ही छातीच्या बरगड्यांमध्ये असते. जेव्हा शस्त्रक्रिया केली जाते तेव्हा सगळी आवरणे बाजूला करून ह्रदयापर्यंत पोहोचायला 1 ते 3 तास इतका वेळ लागू शकतो. नवीन संशोधनानुसार बिटींग हार्ट सर्जरी म्हणजे हृदयाची सर्जरी सुरू असताना केलेली सर्जरी केली जाते, अशी महत्त्वाची माहिती डॉक्टरांमुळे कळली. आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे असं सांगतांना त्यांनी हृदयासाठीच्या वेगवेगळ्या तपासण्यांबद्दल म्हणजे इसीजी,स्टेस् टेस्ट,अँजोग्राफीबद्दल माहिती सांगितली. हृदय हा आपल्या शरीरातील मगत्वाचा भाग आहे. त्यामुळं त्याची शस्त्रक्रिया ही खूपच कौशल्यांच काम आहे. शिवाय हृदयातील ब्लॉक किती आहेत, कोणत्या हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करणार आहात यावरही खर्च अवलंबून असतो असंही डॉ.अजय चौघुले म्हणाले. हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अजय चौघुले यांनी केलेलं मार्गदर्शन ऐकण्यासाठी व्हिडिओवर क्लिक करा.

close