नितेश राणेंच्या राजीनाम्यानंतर काँग्रस कार्यालयाबाहेर धुमश्चक्री

December 10, 2008 1:02 PM0 commentsViews: 11

10 डिसेंबर, मुंबई नितेश राणे यांनी युवा काँग्रेसच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा दिल्यानंतर पक्ष कार्यालयाबाहेर राणे समर्थक आणि काँग्रेस समर्थकांमध्ये बाचीबाची झाली. या बाचाबाचीचं रुपांतर लागलीच हाणामारीत झालं. पोलीस दलानं दोन्ही गटांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री पदासाठी डावलण्यात आल्यानं काँग्रेसविरुद्ध नारायण राणे यांनी उघडपणे बंड पुकारलं. त्यांना पक्षातूनही निलंबित करण्यात आलं.आता त्यांचे सुपुत्र नितेश राणे यांनी मुंबई युवक काँग्रेसच्या सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे. नितेश राणेंसोबत 172 पदाधिकार्‍यांनीही राजीनामे दिले आहेत. या राजीनाम्याची पत्रकार परिषदेत घोषणा करण्यात आली. यानंतर मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आवारात राणे समर्थक आणि काँग्रेस समर्थकांमध्ये बाचाबाची झाली. या बाचाबाचीचं रुपांतर काहीच वेळातच हाणामारीत झालं. तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी दोन्ही गटांवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. राजीनामा प्रकरणानंतर इथलं वातावरण काही वेळेकरता तणावपूर्ण होतं. यावर बोलताना काँग्रेस नेते भाई जगताप म्हणाले की ज्यांना काँग्रेस समजलीच नाही, त्यांना संस्कृती कशी कळणार. आम्ही इथे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या सत्कार सोहळ्याला आलो. नितेश राणेंविरोधात कारवाई करायची की नाही, तो निर्णय युथ काँग्रस घेईल '.

close