मुलांची वागणूक (भाग – 1)

January 29, 2009 12:30 PM0 commentsViews: 20

मुलांची वागणूक हा आजचा टॉक टाइमचा विषय होता. या विषयावर बालरोगतज्ज्ञ डॉ. श्रीकांत चोरघडे आणि डॉ. सुभाष देवढे-पाटील बोलले.प्रत्येक मुलं हे प्रत्येक वयात वेगवेगळ्या प्रकाराचं वर्तन करत असतं. हे वर्तन त्यांच्या पालकांना,समाजाला सोयीच नसतं. म्हणून आपण त्याला वर्तवणूक समस्या म्हणतो. मुलं अंगठा चोखतात, माती खातात अशा अनेक तक्रारी पालक करतात.पण त्या त्या वयात मुलं अशीच असतात. जर दोन वर्षांचा मुलगा अंगठा चोखत असेल तर तो प्रॉब्लेम आहे.माती खाण्याबद्दल त्यांनी सांगितलं की मुलांना वेगवेगळ्या चवींबद्दल उत्सुकता असते. आपण मुलांना निरनिराळ्या चवींची सवय लावली पाहिजे, तर कदाचीत त्यांची माती खाण्याची सवय जाऊ शकेल, असं मुलांची वागणूक या विषयावर बोलताना डॉ. श्रीकांत चोरघडे म्हणाले.मुलं ही नेहमी मोठ्यांचं अनुकरण करतात, लहानपणापासुनच त्यांना चांगल्या सवयी लावल्या पाहिजेत. लवकर उठणं, आपली कामं स्वत:करणं अशा गोष्टी मुलं भवताली पाहतात आणि त्यातून शिकतात. मुलं लहान असतानाच सकाळी एका ठराविक वेळी त्यांना उठून फिरायला नेणं सारख्या सवयी लावल्या तर मोठं झाल्यावर हीच मुलं सकाळी शाळेसाठी उठताना कुरकुर करत नाहीत. अशा अनेक विषयावर त्यांनी मार्गदर्शन केलं.मुलांचा स्वभाव जाणून घ्या. शाळेतून आल्यावर मुलाला आईची मिठी हवी असते. त्याऐवजी जर त्याला हात-पाय धू, कपडे बदल असं सांगितलं तर मुलं नाराज होतील. अशावेळी मुलांचा कल जाणा. त्यांच्या आवडत्या विषयावर त्यांच्याशी बोला…, " असं अत्यंत मोलाचं मार्गदर्शन करताना डॉ. सुभाष देवढे-पाटील म्हणाले.बालरोगतज्ज्ञ डॉ.श्रीकांत चोरघडे आणि डॉ. सुभाष देवढे-पाटील यांनी पालकांना केलेल्या सूचना ऐकण्यासाठी व्हिडिओवर क्लिक करा.

close