कल्याणकरांना वेध देवगंधर्व संगीत महोत्सवाचे

December 10, 2008 2:08 PM0 commentsViews: 7

10 डिसेंबर, कल्याण माधुरी निकुंभ कल्याण मधल्या आचार्य अत्रे नाट्यगृहात 12 , 13 आणि 14 डिसेंबरला देवगंधर्व महोत्सव साजरा केला जाणार आहे. या महोत्सवा अंतर्गत शास्त्रीय संगीतासोबतच शास्त्रीय नृत्याचाही सुरेख मिलाप आपल्याला पहायला मिळणार आहे. 1926 मध्ये कल्याण गायन समाजाची स्थापना झाली आणि नंतर एक स्वतंत्र गायन विद्यालय अस्तित्वात आलं. आजही गायन समाजात सुमारे 350 विद्यार्थी तबला, हार्मोनियमचं शिक्षण घेत आहेत, अशी माहिती कल्याण गायन समाजचे अध्यक्ष नारायण मराठे यांनी दिली. 2002 मध्ये गायन समाजाने देवगंधर्व नावाचा संगीत महोत्सव सुरू केला. या अंतर्गत नेहमीच दिग्गजांच्यां कलाकृती प्रेक्षकांसाठी सादर करण्यात आल्या. गायनात आजपर्यंत 10 लोकांना गंधर्व ही पदवी देण्यात आली आणि त्यातलेच एक पंडित भास्कर बुवा बखले. त्यांच्याच नावाने या महोत्सवाची सुरुवात करण्यात आली आहे. या वर्षीचा महोत्सव अत्रे नाट्यगृहात एकुण चार सत्रांमध्ये होणार आहे. हरीहरन , देवकी पंडित , अजय पोहनकर , अदिती भागवत यांसारखे कलाकार आपले कलाविष्कार सादर करणार आहेत. त्यामुळे आता या सगळ्या तानसेन आणि कानसेनांना देवगंधर्व संगीत महोत्सवाचे वेध लागले आहेत.

close