तयारी दहावीची : भूगोल आणि अर्थशास्त्र – भाग 3

February 3, 2009 11:17 AM0 commentsViews: 17

तयारी दहावीची या भागात आज दहावीच्या विद्यार्थ्यांना भूगोल आणि अर्थशास्त्र या विषयावर मार्गदर्शन करण्यात आलं. भूगोल अर्थशास्त्र या विषयावर बोलण्यासाठी मुंबईच्या सोशल सर्विस लीग हायस्कुलच्या शिक्षिका किशोरी पोटे यांना बोलावलं होतं. त्या एम ए. बीएड आहेत. गेली 18 टर्न त्यांनी एक्झामिनर म्हणुन काम पाहिलय .या कार्यक्रमात त्यांनी सांगितलेले ठळक मुद्दे : * भूगोलातले प्रकरण 4,5,6,7, 8, 9, 11 ह धडे महत्त्वाचे आहेत. त्यावर भर द्यावा. * अर्थशास्त्रातले प्रकरण 2,3,4 आणि 5 जास्त महत्त्वाचे आहेत * नकाशे सतत बघावे, म्हणजे चुका होणार नाहीत. * अर्थशास्त्रात ग्राहकांचे कर्तव्य, ग्राहकांच्या शोषणास कारणीभूत घटक हा भाग महत्त्वाचा आहे. * अर्थशास्त्रातील सार्वजनिक वितरण प्रणालीतील दोष या भागावर जोर द्यावा. * अर्थशास्त्राचा पेपर लिहिताना अर्थशास्त्रीय भाषा आणि शब्द वापरणं आवश्यक आहे. * भूगोलातील खनीज संसाधन आणि जलसंसाधन ही प्रकरणं नकाशाच्या दृष्टीने महत्वाची आहेत. * वस्तुनिष्ठ (ऑबजेक्टिव्ह) प्रश्नांची चांगली तयारी करावी. त्यात पूर्ण मार्क्स मिळू शकतात. * दिर्घोत्तरी प्रश्नांची उत्तरे लिहिताना प्रस्तावना लिहावी * योग्य ठिकाणी नकाशाद्वारे ठिकाणं दाखवावीभूगोल आणि अर्थशास्त्र या विषयावर तज्ज्ञ शिक्षिका किशोरी पोटे यांनी केलेले मार्गदर्शन पाहण्यासाठी सोबतच्या व्हिडिओवर क्लिक करा.

close