लढा कुष्ठरोगाशी – भाग 1

February 3, 2009 1:10 PM0 commentsViews: 14

कुष्ठरोग तसा दुर्लक्षित रोग आणि त्यामुळेच त्याच्याबद्दल असणारे गैरसमज अधिक आहेत. आज टॉक टाईम मध्ये 'लढा कुष्ठरोगाशी' या विषयावर बोलण्यासाठी डॉ. अविनाश खाडे आले होते.कुष्ठरोग हा अनुवांशिक नाही. त्याची लागण हवेतून कुष्ठजंतू या जिवाणूमुळे होते. भारतात 2% लोकांनाच या जंतुचा प्रादुर्भाव होतो पण त्यातुनही कुष्ठरोग होणार्‍यांचे प्रमाण फारच कमी आहे. प्रतिकारशक्ती जितकी मजबूत तेवढी हा रोग होण्याची शक्यता कमी. हाता-पायाची बोटे वाकडी होणे,चेहरा सुजणे असे या रोगाचे स्वरुप आहे. लक्षणांमध्ये त्वचेवर उठलेला कोणत्याही रंगाचा चट्टा वा डाग जो दुखत नाही,ज्याला कोणतीही संवेदना नाही तो कुष्ठरोग असू शकतो.वेळीच निदान आणि योग्य उपचार याने कुष्ठरोग पूर्णपणे बरा होऊ शकतो.त्यामुळे वेळ न घालवता आपल्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन सल्ला घेणं आवश्यक आहे.आपल्या शरीरातील चेतातंतू कुष्ठजंतुची लागण झाल्यामुळे कार्य करणं बंद करतात त्यामुळे त्वचेला कोणत्याही प्रकारची संवेदना होत नाही. अशा रुग्णांनी गरम वस्तू वापरतांना, चालताना विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. सगळेच चट्टे कुष्ठरोग नसतात परंतु आपण सावधान रहाणं महत्वाचं आहे असं डॉ. अविनाश खाडे यांनी सांगितलं

close