फसव्या जाहिराती – भाग 1

February 4, 2009 3:12 PM0 commentsViews: 5

आजच्या ग्राहकांवर जाहिरातींचा परिणाम मोठा आहे. मात्र जाहिरातींना बळी पडल्यावर झालेली नुकसान भरपाई कुठून आणि कशी मिळवावी आणि मुळातच एखादी वस्तू खरेदी करण्याआधी कोणती खबरदारी घेतली पाहिजे या विषयावर आज टॉक टाईममध्ये चर्चा करण्यात आली. या विषयावर मुंबई ग्राहक पंचायतीच्या ऍड वॉच क्लबच्या प्रमुख अनुराधा देशपांडे यांनी मोलाचं मार्गदर्शन केले.मुळातच जाहिरात हे आपले प्रॉडक्ट लोकांपर्यंत पोहचवण्याचे प्रभावी माध्यम आहे. शिवाय स्पर्धा मोठी असल्यानं अनेक कंपन्या एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या नादात सत्यापासून भरकटत जातात आणि जाहिरातदारांच्या पोकळ दाव्यांमुळे ग्राहक फसले जातात. त्यामुळे ग्राहकांनी डोळे उघडे ठेऊन जाहिराती पाहिल्या पाहिजेत.एखाद्या जाहिरातींमुळे जर तुम्ही फसवले गेला असाल तर त्याची तक्रार करणं जरुरी आहे. ग्राहकांच्या अशाच समस्यांसाठी ग्राहक पंचायत काम करते, त्याच्या आधारे तुम्हाला न्याय मिळू शकतो. इतकचं नाही तर जर जाहिरातीतून चुकीचा संदेश पसरत असेल तर जाहिरातदाराला आपली जाहिरात बदलून त्याची सुधारीत आवृत्ती करावी लागते.सगळ्याच जाहिराती फसव्या नसतात. काही पर्यावरणाला पोषक, काही संदेश देणा-या जाहिरातींही असतात. हे माध्यम खूप प्रभावी आहे, त्याचा योग्य वापर केला तर खूप चांगला परिणाम होऊ शकतो.